Type to search

नाशिक

हातगड येथे स्वच्छता अभियान

Share

हतगड (वार्ताहर) : सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ला पर्यटन परिसरात सुरगाणा गटविकास अधिकारी श्री.केशव गड्डापोड ,जिल्हा परिषद सदस्य सौ.ज्योतीताई जाधव हतगड, सभापती सुरगाणा सौ.सुवर्णा गांगोडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

हतगड येथील सरपंच मीरा पीठे,ग्रा. सदस्य पुंडलिक पवार, राधा खंबाईत , गिरजा मोहन , वंदना बागुल, गट समन्वय स्वच्छता विभाग सुरगाणा श्री .आत्माराम चौधरी, दिलीप गांगुर्डे,आदि उपस्थित राहून हतगड किल्ला पर्यटन स्थळ परिसर स्वछता उपक्रम सगळ्यांच्या श्रमदानातुन राबविण्यात आला .

याबाबत सुरगाणा तालुक्यात स्वच्छते बाबत जनजगृती करणेसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे बाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार स्वच्छता हिच सेवा अभियान १५ सप्टेंबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत प्रभाविरित्या राबविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!