Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात २९ करोना संशयितांवर उपचार; आज नव्याने ५ रुग्ण दाखल

नाशिक जिल्ह्यात २९ करोना संशयितांवर उपचार; आज नव्याने ५ रुग्ण दाखल

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात २९ कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील २५ संशयित सोमवारी (दि.३०) तर ५ संशयित मंगळवारी (दि.३१) दाखल झाले आहे. या सर्वांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात लासलगाव येथील १ पाँझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे.

- Advertisement -

जिल्हा शासकीय रुग्णालयात ५ संशयितांवर उपचार सुरु असून मालेगाव सामान्य रुग्णालयातही १० जणांवर उपचार सुरु आहेत. तर शहरतील मनपाच्या जाकिर हुसेन रुग्णालयात १४ संशयित दाखल आहेत.

यातील बहुतेक जण लासलगाव येथील युवकाचे नातेवाईक आहेत. पैकी २९ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने सोमवारी तर ५ जणांचे मंगळवारी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यातील जवळपास १९ अहवाल प्राप्त झाले असून सर्वही निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये लासलगाव येथील कोरोना असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे कळते.

परदेशातून आलेल्या ७५४ पैकी २२१ नागरिकांची १४ दिवस नियमित तपासणी करण्यात आली आहे. तसेच ५३३ नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरु आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.३१) परदेशातून २० नागरिक शहरासह जिल्ह्यात आले आहेत. तसेच आजपर्यंत १०२ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुणे तपासले असून त्यातील ७२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात आज  १९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या