Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात दोघांची आत्महत्या

Share

नाशिक । प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी दोघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पाथर्डी शिवारात युवकाने तर पांडवनगरीमध्ये महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मीनाताई राजेंद्र चव्हाण (46, रा. पांडवनगरी, इंदिरानगर) असे आत्महत्या करणार्‍या महिलेचे नाव आहे. त्यांनी शुक्रवारी (ता.28) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

संदीप पोपट वाघचौरे (34, रा. गौळाणेरोड, पाथर्डी शिवार) या व्यक्तीनेे पाथर्डी फाटा येथील जी.पी. स्वीटस् दुकानासमोर शनिवारी (ता.29) रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते.

भाऊ सुमीत याने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. या दोन्ही प्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!