Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : नाशिक पोलिसांच्या ताफ्यात दोन नव्या ‘इंटरसेप्टर’

Share

नाशिक : पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत नाशिक पोलिसांना दोन अत्याधुनिक वाहने मिळाली आहेत. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कायदेविषयक सकारात्मक बदल होत आहेत. त्यांचाच एक भाग म्हणून व पोलीस खाते अत्याधुनिक करणेकरीता एक प्रगत पाऊल म्हणून पोलिसांच्या वाहन ताफ्यामध्ये अत्याधुनिक साधनांनी युक्त अशी वाहन वाहतूक नियमन करीता आणण्यात आली आहे.

आजच्या युगामध्ये रास्ता व रस्त्यावरील वाहने याना प्रगतीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आले. परंतु वाहनाच्या अतिरेकी वेगामुळे अनेक अपघात दररोज घडत असतात. यावर उपाय म्हणून कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करून तसेच विविध जनजागृती कार्यक्रमांचे यामाध्यमातून लोकांमध्ये वाहन व वाहनकायद्याबाबत जनजागृती केली जात आहे.

हे आहेत फीचर्स

०१. व्हिडीओ बेस्ड लेजर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम (लेजर स्पीडगन) यात लेजर सीड डिवाइस व hard end full HD Camera (Long Focus) वाहनांचा वेग व अंतर मोजले जाते. -व्हिडीओ क्लिप रेकॉर्ड करून साठविला जाऊ शकतॊ. (२५० जीबी डेटा)

०२. ब्रेथ अनालायझर मद्याच्या सेवनाखाली असतांना वाहन चालवल्यामुळे अपघात होतात. तयार प्रतिबंध करण्याकरिता सदर वाहनामध्ये ब्रेथ अनालायझर उपलब्ध करून दिले आहे.

०३. वाहनांच्या काचा काही मर्यादेपर्यंत आपण डार्क करू शकतो. या टीन्ट मीटरच्या माध्यमातून गाडयांच्या काचांची व्हीएलटी (Visible Light Transmittance ) तपासले जाते.

वाहनामध्ये दोन स्वतंत्र्य बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत, पैकी एकामध्ये लाईट स्क्रिन व दुसरे मध्ये सेन्सर आहे. काचेच्या दोन्ही बाजूस हा बॉक्स जोडल्यानंतर त्याचे स्क्रिनवर गाडीच्या काचेची दृश्यमानता दिसून येते.

अशा प्रकारे नाशिक पोलिसदलामध्ये वरील तीन अत्याधुनिक साधनांनी सज्ज अशा दोन नवीन एर्टिगा वाहनाचे आगमन झाले आहे. वाहतूक नियमनकरिता या अत्याधुनिक वाहनांमुळे अत्यंत मोलाची मदत होऊन भविष्यात वाहतूक नियमन नियंत्रण हे सुलभ होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!