Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात ऑपरेशन ऑलआऊट; 128 गुन्हेगारांवर कारवाई

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहर पोलीसांनी गुरूवारी (दि.18) मध्यरात्री अचानक शहरातील 33 झोपडपट्यांमध्ये ऑपरेशन ऑलऑऊट राबवत कारवाई केली. यामध्ये विविध गुन्ह्यांतील 128 सराईंतांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीसांकडून गुंडांवर कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे गुरूवारी मध्यरात्री अचानकसर्व झोपडपट्यांमध्ये ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले. यामध्ये सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शरीरा विरूद्ध, माला विरूद्धचे गुन्हे, दहशत पसरवणारे, अवैध अस्थापना, हवे असलेले गुन्हेगार, टवाळखोर, रेकॉर्डवरील गुन्हेगार अशांचा शोध घेऊन प्रत्यक्ष 128 गुन्हेगारांची धरपकड केली. शहरातील हॉटेल, लॉजेस, धाबे, धर्मशाळा यांची कडक तपासणी करण्यात आली.

तर शहरातील नांदुरनाका, सिन्नर फाटा, संसारी नाका, म्हसरूळ गाव, अंबड टी पॉइंट, सिडको हॉस्पीटल, मालेगाव स्टॅण्ड, ठक्कर बाजार, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, चोपडा लॉन्स, भाभानगर, पाथडीफाटा, नारायणबापु चौक अशा विविध 15 ठिकाणी 1 अधिकारी, 6 कर्मचारी अशा पथकांची नेमनुक करून प्रभावी नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान वाहतुक नियम मोडणारे, विना हेलमेट, वाहनांच्या परवाने, कागदपत्रांची तपासणी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, कोटपा अशा विविध स्वरूपाच्या कावाई करण्यात आल्या.

ऑलआऊट कारवाईत पंंचवटी पोलीस ठाण्यातील तडीपार गुंड गणेश कालेकर यास पकडून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अंबड व सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रोव्हिशन कायद्याखाली 3 जणांना अटक करण्यात येऊन त्यांच्या ताब्यातून 3 हजार रूपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाकडून अवैध साठा केलेला 69 हजाराचा गुटखा व सुगंधी पान मसाला जप्त करण्यात आला. प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून गोमांस बाळगणार्‍या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 950 किलो गोमांस जप्त करण्यात आले.

या कारवाईत पोलीस आयुक्त नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त, लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त अशोक नखाते, आर. आर. पाटील, मोहन ठाकुर, 20 पोलीस निरिक्षक, 85 सहायक पोलीस निरिक्षक, 589 पोलीस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!