मोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

नाशिक । प्रतिनिधी
मोबाइल हिसकावून पळ काढणार्‍या टोळीतील तिघां संशयितांना गंगापूर पािेलसांनी शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून जबरी चोरीतील 16 मोबाइल, 1 लॅपटॉप, दोन दुचाकी आणि धारदार शस्त्र असा 2 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मयूर राजेंद्र राजपूत (25), मंगेश नाना धिवरे (21, रा. दोघे रा. धुळे), शुभम कैलास पाटील (22, रा. समतानगर, सातपूर कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून येणारे संशयित नागरिकांचे मोबाइल हिसकावून नेत असल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली होती. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघ, पोलीस नाइक कैलास भडिंगे, पोलीस शिपाई नितीन नेटारे आणि तुळशीदास चौधरी यांच्यासह गस्त घालत असताना त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीच्या पाठीमागील नंबर प्लेटला रुमाल बांधून तीन संशयित भरधाव वेगाने जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी तिघांचा पाठलाग करून त्यांना अडवले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी मोबाइल हिसकावून नेत असल्याची कबुली दिली. या तिघांकडून पोलिसांनी 16 चोरीचे मोबाइल, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयितांकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

*