Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : होत ‘मॉकड्रील’ अफवा दरोड्याची…

Share

नाशिक : इंदिरानगर परिसरातील बँकेवर दरोडा पडल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली अन शहरातील नागरिकांची धांदल उडाली.पुन्हा काही अनूचित प्रकार घडला की काय, अशी शंकेची अनेकांच्या मनांत आली. परंतु हा कुठल्याही प्रकारचा दरोडा नसून कायदा सुव्यवस्थेसाठी मॉकड्रील राबविल्याचे त्यांनी सांगितले.

दुपारपासून सदर संदेश हा व्हाट्सअप वर फिरत होता. त्याचवेळी नाशिक पोलिसांनी सतर्क होत नागरिकांंनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती दिली होती. दरम्यान इंदिरानगर परिसरात हे मॉकड्रील राबविण्यात आले. अनुचित प्रकार घडल्यानंतर काय करावे, कशापद्धतीने परिस्थिती सांभाळावी या पद्धतीचे आणि  पोलीस दलाच्या कार्यतत्परतेचे दर्शन घडवणारे मॉकड्रील राबविले जात आहे.

दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांकडून मिळणारा जलद प्रतिसाद या मॉकड्रीलच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नांगरे पाटील यांनी हा दरोडा नसून रंगीत तालीम असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!