Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलिसांनी तक्रारदारांना वाटला २३ लाखांचा मुद्देमाल

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहरात झालेल्या घरफोड्या, मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी अशा गुन्ह्यात संशयित चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केलेला तब्बल 23 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ तक्रारदार अर्थात फिर्यादींना पोलीस आयुक्तालयाने (दि. 30) परत केला आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे 3 कोटी रुपयांचा ऐवज पोलिसांकडून फिर्यादींना देण्यात आला आहे.

शहरातील उपनगरांमध्ये झालेल्या घरफोड्या, मोटारसायकल चोरी, सोन्या-चांदीचे दागिने चोरणे, रोख रक्कम चोरून नेणे यासह अन्य प्रकारच्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस ठाणे आणि गुन्हेशाखा युनिट एक आणि दोनच्या पथकांनी संशयितांंना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व रोकड हस्तगत केली होती.

त्यानुसार जप्त केलेल्या मुद्देमालांची फिर्यादींच्या तक्रारीवरून शहानिशा करून तो पुन्हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मूळ तक्रारदारांना परत केला जातो.

गुरुवारी (दि.30)पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तालयात फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यात पोलीस विभागाकडून सुमारे 22 लाख 91 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज परत करण्यात आला असून यात गेल्या तीन ते चार वर्षांत विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 8 फिर्यादींचे चोरी झालेले 6 लाख 61 हजार रुपये किमतीचे सोने, 15 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 23 मोटारसायकल, 68 हजार रुपये किमतीचे 6 फिर्यादींचे मोबाईल फोन आणि 20 हजार रोख असा मुद्देमाल परत करण्यात आला. चोरी गेलेल्या वस्तू परत मिळाल्याचा आनंद तक्रारदारांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळाला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!