Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

परिमंडळ एकमधून सात गुन्हेगारांची तडीपारी

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकमधून सात सराईत गुन्हेगारांची शहर-जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारी करण्यात आली आहे. परिमंडळ एकमधून आतापर्यंत 125 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी आणखीन 11 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच एका टोळीवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

फरहान ऊर्फ दहशत कलीम शेख (20, रा. चौकमंडई, भद्रकाली), राहुल रतन खैरे (21, रा. दिंडोरी रोड), विकी ऊर्फ टमाट्या शामलाल कुटे (23, रा. मल्हार खाण), कृष्णा मधुकर जाधव (19, रा. पोलीस मुख्यालय), हेमंत शांतीलाल परदेशी (23, रा. पोलीस मुख्यालय), समीर मुनीर सय्यद (22, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) आणि मुस्तकिम ऊर्फ मज्जा रहिम खान (28, रा. वडाळानाका) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुन्हेगारी कारवाया करून शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्‍या सराईतांवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार परिमंडळ एकमधील गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, मुंबईनाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्त पाटील यांनी गुन्हेगारांचा आढावा घेत तडीपारीची कारवाई केली. त्या गुन्हेगारांमध्ये दोन पोलीस पुत्रांचा समावेश आहे. तडीपार केलेल्या सातपैकी तीन गुन्हेगारांना शहापूर, कोपरगाव आणि संगमनेर या जिल्ह्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई शक्य आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!