Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सीसीटीव्ही कॅमेरा व व्हर्च्युअल इंटेलिजेन्सद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार

Share

नाशिक : इंटिग्रेटेड कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर मध्ये आणि शहरात विविध भागात असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेरा व व्हर्च्युअल इंटेलिजेन्सद्वारे अपराधांवर प्रभावी नियंत्रण करणे शक्य होणार आहे. यामुळे विविध गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे.

स्मार्ट सिटी व शहर पोलीस यांच्या समन्वयातून आता स्मार्ट सिटी बनत असलेले नाशिक शहर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

शहरातील गणेशोत्सव आणि गणेशोत्सव काळातील मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि शहरात साकारल्या जाणार्‍या इंटिग्रेटेड कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर (खउउउ)च्या पाश्वर्र्भूमीवर पोलिसांचे नियंत्रण कक्ष उभारण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त बोलत होते.

पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस शाखा आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षा आणि सुविधा देण्यासंदर्भात समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा आणि स्मार्ट सिटीच्या समन्वयातून वाहतूक सुरळीकरण करण्यासंदर्भात कार्यशाळा घेणार असल्याचे व समन्वयातून जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

तसेच स्मार्ट पार्किंगच्या कामांची माहिती थविल यांनी आयुक्तांना दिली. त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबतची उपयुक्तता नागरिकांना समजावून सांगून त्यांना यात सहभागी करून घेण्यासंदर्भातही पोलीस आयुक्तांनी सूचना केली. इंटिग्रेटेड कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर मध्ये शहरात विविध माहिती दर्शवण्यासाठी व्हेरिएबल मेसेज बोर्ड, माहिती देवाणघेवाणीसाठी कियॉस्क, एनव्हायरमेंटल सेन्सर्स, फ्लड सेन्सर्स, स्मार्ट डस्टबिन्स, इमर्जन्सी कॉल बॉक्स, शहरातील वाहतूक चौकांसाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, डाटा सेंटर / डेटा रिकव्हरी सेंटर, सिटीझन एक्सपिरीयन्स सेंटर, इंटिग्रेटेड पोर्टल व मोबाईल अ‍ॅप, स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, हेल्प डेस्क यांचा समावेश आहे.

कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरद्वारे शहराचे पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यात येणार आहे. मोठ्या व्हिडीओ वॉलवर नाशिक शहरातील एएमआर स्काडा वॉटर मीटर, सीसीटीव्ही, स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाईट, स्मार्ट पार्किंग, बस सर्व्हिस वाहतूक यंत्रणेसाठी आयटीएमएस या सर्व सर्व्हिसेस विविध सेन्सर्स व ऑप्टिकच्या माध्यमातून या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार असून कॉमन प्लॅटफॉर्मवर आणण्यात येणार आहे.

या सर्व प्रणालींच्या डेटाबेसचे पृथ्थकरण करून शहरातील विविध सर्व्हिसेस पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यात येणार आहे. शहरातील एखाद्या सिग्नलवर किंवा कोणत्याही भागात वाहतूक नियम मोडणार्‍यास तत्काळ इ-चलन पाठवण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!