Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Share

नाशिक । प्रतिनिधी
तालुका पोलीसात तक्रार देण्यासाठी आलेल्या नशेबाजासह त्याच्या पत्नीनेही गोंधळ घालत, महिला पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली तर झटापटी करीत संशयिताने विनयभंग केला. याप्रकरणी पती पत्नीविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत सुधाकर जाधव (25), ज्योती सुधाकर जाधव (दोघे रा. जलालपूर, ता.जि. नाशिक) असी गुन्हा दाखल झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यशवंत धर्मा पवार यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता.20) सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारासह दोन महिला पोलीस कर्मचारी हजर होते.

त्यावेळी संशयित यशवंत जाधव व ज्योती जाधव हे दोघे संशयित आले. संशयितांनी तक्रार आधी नोंदवून घेण्यासाठीची कुरापत काढून वाद सुरू केला. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांना अश्लिल शब्द वापरून त्यांच्या अंगावर धावून जाऊन झटापटी करीत विनयभंग केला.

तसेच, अश्लिल शिवीगाळ करीत, ठाणे अंमलदारासमोरील टेबल उलचून फेकला, तसेच दमबाजी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोघा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा, विनयभंग, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!