नाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी..

0
26 ऑगस्ट 2018 रोजी फ्रान्समधील विची शहरात नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला.

आदर्श कोण, एक बाप का मुलगी? हेच ठरवणे काही वेळेला कठीण होऊन जाते. डॉ.रवींद्रकुमार सिंगल आणि त्यांची कन्या रविजा सिंगल हे दोघेही बाप-लेक तमाम भारतीयांसाठी आदर्श ठरले आहेत. केवळ 18 व्या वर्षात हाफ आयर्न लेडी होण्याचा मान रविजा हिने मिळवला आहे. त्यामुळे तिचाच आदर्श घेऊन वडील डॉ. सिंगल यांनी प्रेरणा घेत आयर्न मॅनचा ध्यास घेतला.

रविजाचेच प्रशिक्षक डॉ. मुस्तफा अबीद टोपीवाला आणि स्पोर्ट्समेडचे डॉ. मिलिंद पिंप्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची एक दिनचर्या निश्चित करून रोज नियंत्रित आहार, व्यायाम, धावणे आणि किमान 25 ते 50 कि. मी. सायकलिंगचा कि. मी. सराव सुरू केला आणि स्पर्धेची तयारी सुरू केली. याच दरम्यान त्यांनी तयारीचाच एक भाग म्हणून पुणे ते गोवा 650 कि.मी.ची ‘डेक्कन क्लिफहँगर’ ही स्पर्धाही पूर्ण केली. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला गेला.

विशेष बाब : या स्पर्धेसाठी डॉ. रवींद्रकुमार सिंगल (51) आणि त्यांची कन्या रविजा सिंगल (17) या केवळ दोनच भारतीयांनी भाग घेतला होता. परंतु, यातील सायकलिंग या स्पर्धेत रविजा सिंगल केवळ 5 मिनिटे मागे राहिल्याने ती ही स्पर्धा जिंकू शकली नाही. परंतु, या बाप-लेकीने या स्पर्धेत भाग घेऊन जगभरात नाव प्रसिद्ध केले आहे. किंबहुना एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.

डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आज तरी नाशिकमधील एक आदर्श अस व्यक्तिमत्त्व आहे. सन 2003 या सिंहस्थ काळातील त्यांच्या कारकिर्दीची सुयोग्य दखल घेऊन शासनाने 2014 च्या सिंहस्थ काळात त्यांची खास नेमणूक केली. हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान तर होताच, शिवाय त्यांच्यावर असीम विश्वास दर्शवत होता.

कुंभमेळ्यात त्यांचे नाशिक शहराशी नाते अधिकच दृढ होत गेले आणि लोकांना आपलसे करून घेतल्याने आम्हा नाशिककरांना सिंगलसर कधी परके वाटलेच नाहीत. गत दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी नाशिककरांना सोबत घेऊन अनेक उपक्रम राबवले. शासकीय सेवेतील अधिकारी आणि शहरवासियांना शिस्तबद्धचे वस्तुपाठ घालून दिल्याचे श्रेय डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे जाते.

त्यांच्या या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रमांचा धडाका लाऊन आम्हा नाशिककरांना जागृत केले आहे. सलग दोन वर्षे नाशिक मॅरेथॉन या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करताना त्यांनी अनेक नाशिककरांना स्वत:बरोबर जोडले असून नाशिक शहराला मॅरेथॉनचे शहर म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे,

याची जाणीव आम्हा समस्त नाशिककरांना असून त्यांच्यासोबतीने नवनवीन सामाजिक कार्य करण्यासाठी नाशिककरांमधे अहमहमिका सुरू असते, ही बाब आपल्या सर्वांसाठी निश्चितच आनंदाची आणि आश्वासकच होय. समस्त नाशिककरांतर्फे त्यांना हा मनाचा मुजरा!

– लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त
– एन.सी. देशपांडे, नाशिक

नोंदवलेली कामगिरी

पोहणे : 3.86 कि. मी. 1 तास 50 मिनिटे 17 सेकंद पोहणे ते सायकलिंग : 14 मिनिटे आणि 30 सेकंद सायकलिंग : 180.25 कि. मी. 7 तास 12 मिनिटे आणि 59 सेकंद सायकलिंग ते धावणे : 9 मिनिटे आणि 39 सेकंद धावणे : 42.195 कि.मी. 5 तास 45 मिनिटे आणि 57 सेकंद एकूण 16 तासांऐवजी केवळ 15 तास 13 मिनिटे एवढ्या कमी वेळात म्हणजेच 47 मिनिटे शिल्लक असतानाच पूर्ण करून आयर्न मॅन हा किताब पटकावला.

शहरात राबवलेले उपक्रम…

हेल्मेट, सिट बेल्टचा वापर
नो हॉर्न डे
डॉन-दोस्त ऑफ नाशिक
आदर्श रिक्षा चालकांचा सत्कार
छोटा पोलीस अभिनव उपक्रम
ट्रॅफिक अ‍ॅम्बेसेडर
सायबर अ‍ॅम्बेसेडर
ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप
पर्यावरणपूरक गणेशोत्सव
बाल बिरादरी
भिक्षेकरीमुक्त अभियान
रोड सेफ्टी-बाईक रॅली
पुन्हा घरी
मंथन वाचनालय
मॅरेथॉन स्पर्धा
मीच माझी रक्षक
ऑपरेशन आधार
पोलीस आयुक्त चषक क्रिकेट स्पर्धा
सायबर फ्रेंडस् सायबर क्लब
पर्यटन पोलीस पथक-टूरीस्ट पोलीस व्हॅन
अभिनव महिला दिन
स्टॉपिंग झोन-यलो क्रॉसिंग
मर्दानी स्कॉड
महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन व चेंजिंग रुम
इको फ्रेंडली गणेशोत्सव
मोबाईल फॉरेन्सिक लॅब व फिंगर प्रिंट युनिट
सिनीअर सिटीझन फोरम
रिक्षा सारथी
स्मार्ट पेट्रोलिंग व्हाया क्यू आर कोड सिस्टिम
मुद्देमाल वापसी कार्यक्रम-3
रेकॉर्ड डिजिटालायझेशन
कॉम्पॅक्टर फॉर किपिंग रेकॉर्ड
स्पर्धा परीक्षापूर्व तयारी कार्यशाळा
मंथन आणि भरारी लायब्ररी
पोलीस कुटुंबियांसाठी सहल

LEAVE A REPLY

*