Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात रात्र भर मिशन ऑलआऊट; रेकॉर्डवरील 152 सराईंतांची तपासणी

Share

नाशिक : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.22) रात्रभर शहरात मिशन ऑलआऊट राबवत झाडसत्र घेतले. यामध्ये रेकॉर्डवरील 152 सराईतांचा शोध घेण्यासह दोनशेपेक्षा अधिक संशयितांची धरपकड केली.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांच्या आदेशानुसार आयुक्तालया अंतर्गत तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे मिशन ऑल आऊट मोहिम राबवण्यात आली. त्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील 87 गुन्हेगारांवर कारवाई केली. तसेच बेशिस्त चालक, अवैध मद्यवाहतूक, मद्यपी चालकांसह टवाळखोरांवरही कारवाई केली. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार केलेले गुन्हेगारांची शोधमोहिम केली. तसेच शहरातील झोपडपट्ट्यांची तपासणी केली.

त्यात रेकॉर्डवरील 152 पैकी 87 गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली. तसेच 87 टवाळखोरांवर कारवाई केली. तडीपार केलेल्या 44 गुन्हेगारांची तपासणी करून त्यापैकी दोघांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली. विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या 39 पैकी 6 गुन्हेगारांना शोधण्यात आले. तसेच शहरातील 88 हॉटेल, धाबे, लॉजची तपासणी करून दोन ठिकाणी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

शहरात 21 मद्यपी चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून 10 वाहने जप्त केली आहेत. शहरात 16 ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत 701 वाहनांची तपासणी केली त्यापैकी 136 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून 28 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैधरित्या मद्यवाहतूक केल्याप्रकरणी दोन कारवाई करीत पोलिसांनी 2 वाहनांसह 8 लाख 82 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या मोहिमेत पोलीस आयुक्तांसह 4 पोलीस उपायुक्त, 5 सहायक आयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 362 पोलीस कर्मचारी आणि 34 होमगार्डचे जवान सहभागी झाले होते.

अशी झाली कारवाई
* 87 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई
* 2 तडीपारांवर कारवाई
* 87 टवाळखोरांवर कारवाई
* 6 संशयित आरोपींवर कारवाई
* 21 जणावर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई
* 136 वाहनांवर कारवाई 28 हजार 700 रूपये दंड जमा
* 10 वाहने ताब्यात

या 16 ठिकाणी नाकाबंदी
पोलिसांनी ही कारवाई नांदुरनाका, सिन्नरफाटा, संसरीनाका, म्हसरूळ, अंबड टी पॉईंट, सिडको रूग्णालय, मालेगांव स्टॅण्ड, ठ्क्कर बाजार, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापूनगर, चोपडा लॉन्स, भाभानगर, पाथर्डी फाटा.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!