Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात आजपासून 10 निर्भया पथके

Share

नाशिक । प्रतिनिधी
महिलांवरील अत्याचार, लैंगिक छळ, छेडछाड, महिलांविषयक गुन्हे नियंत्रित करण्यासाठी तसेच टवाळखोर गुन्हेगारांची मानसिकता बदलण्यााठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने अधुनिक स्वरूपात शहरात 10 निर्भया पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शनिवारी (दि.8) दुपारी होणार आहे.

पोलिस आयुक्तालयात पार पडणार्‍या या कार्यक्रमास पालकमंत्र्यासह खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप उपस्थित राहणार आहेत. महिलांची छेडछाड हा फोन कॉल, मेसेज, ई-मेल, सोशल मीडियाचा वापर करून किंवा प्रत्यक्षरित्या महिलेची छेड काढली जाते, अशा वेळी महिलांना विनाविलंब पोलिसांची मदत उपलब्ध करून

देऊन त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, महिला, शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे होणारे दुर्लक्ष व त्यातून अपराध्यांचे वाढणारे बळ यांवर प्रभावी नियंत्रण आणणे, पुरुषांना विशेषत: तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाची समुपदेशनातून जाणीव करून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने त्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून अधुनीक स्वरूपात 10 निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.

या पथकातील अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात पॅट्रोलींग करतील. यावेळी छेडाछाड व टवाळखोरी करणार्‍या संशयितांविरूद्ध थेट कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रभावी काम करण्यासाठी निर्भया पथकातील कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

550 हॉट स्पॉट
शहरातील मुली, महिलांची संख्या जास्त असणारे व छेडछाडीचे प्रकार होणारे 550 हॉटस्पॉटचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील महाविद्यालये, सर्वाजिक उद्याने, बसस्थानके, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे या ठिकाणांवर ही पथके लक्ष केंद्रीत करणार आहेत. त्यांच्याकडे असणार्‍या छुप्या कॅमेरांद्वारे चित्रीकरण करण्यात येऊन भक्कम पुरावाही मिळवला जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!