Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बाजार समितीची बैठक दहशतीच्या सावटाखाली तहकूब; गुरुवारी पुन्हा बैठक

Share
पंचवटी | वार्ताहर
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये कोरम पूर्ण न झाल्याने बैठक तहकूब करण्यात आली. पणन कायद्यानुसार तहकूब करण्यात आलेली बैठक तीन दिवसांनंतर म्हणजे गुरुवार दि ५ रोजी घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

उपस्थित संचालकांनी कोरम अभावी असलेली बैठक तहकूब करून लागलीच दुसरी बैठक घेण्याचा आग्रह धरला होता मात्र, सभापतींच्या नातेवाईकाने थेट सभागृहात प्रवेश करीत सचिवांचे फोनवरून कोणाशी तरी बोलणे करून देताच बैठक आटोपती घेण्यात आल्याने या बैठकीवर दहशतीचे सावट दिसून आले.

बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाखांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सभापती शिवाजी चुंभळे यांचे सह्यांचे अधिकारी गोठविले आहे. सभापती शिवाजी चुंभळे यांचे सहीचे अधिकार काढल्याने इतर संचालकांना सह्यांचे अधिकार देण्यासाठी तातडीने सर्व साधारण सभेचे आयोजन सोमवार दि २ रोजी करण्यात आले होते.
या बैठकीला संचालक शंकर धनवटे,रवींद्र भोये,तुकाराम पेखळे,प्रभाकर मुळाणे,विश्वास नागरे,दिलीप थेटे,संजय तुंगार,शासकीय सदस्य हेमंत खंदारे,सुनील खोडे,रामदास महाले,हंसराज वडघुले आदी उपस्थित होते . तसेच संचालक ताराबाई माळेकर यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याने रजेचा अर्ज दिला होता.
बाजार समितीची बैठक घेण्यासाठी मतदानाचा हक्क असलेल्या एकूण सदस्यांपैकी निम्म्यापेक्षा एक अधिक सदस्यांची गणपूर्ती असणे गरजेचे असते . मात्र,१८ संचालकांपैकी मतदानाचा हक्क असलेले सातच सदस्य हजर असल्याने सभा तहकूब करण्यात आली .
पणन कायद्यानुसार सभा तहकूब करून लागलीच दुसरी सभा घेण्याचा आग्रह उपस्थित संचालकांनी धरला . त्यासाठी पणन कायद्याच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले . मात्र,सचिव अरुण काळे यांनी तहकूब सभा तीन दिवसानंतर घेण्याची तरतूद असल्याचे सांगितले . त्यावर संचालकांनी आक्षेप घेत लागलीच सभा घेण्याची तरतूद असल्याचे सांगत आग्रह धरला.
सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली सभा अकरा वाजता तहकूब करण्यात आल्यानंतर सभा घेण्यासाठी सुरु असलेली वादळी चर्चा सुरु असताना दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सभापती शिवाजी चुंभळे यांचे नातेवाईक बाजार समितीच्या सभागृहात प्रवेश करून सचिव अरुण काळे यांच्याकडे मोबाईल फोन देत कोणाशीतरी बोलणे करून दिले.
यानंतर मात्र,संपूर्ण बैठकीचा सुरच बदलला विरोधी गटाचे संचालक आत्ताच बैठक सुरू करण्याचे सांगत होते त्यांनी तीन दिवसांनंतर घेण्यात येणाऱ्या बैठकीला आपली तयारी असल्याचे सांगितले आणि बैठक संपविण्यात आली .
बैठक सुरू असताना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर बैठकीला उपस्थित संचालकांनी बाहेरची गर्दी बघून कार्यालयात बसून राहिले. त्यानंतर काहीवेळाने पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांना संरक्षण देत गाडीत बसवून बाहेर सोडून आले. हा सर्व प्रकार बघता उपस्थित संचालक दहशतिच्या सावटाखाली दिसून आले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!