Type to search

‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय

Share

नाशिक : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा 2018 ही स्पर्धा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय संदीप इंस्टीट्यूट ऑफ़ इंजीनियरिंगकडून ‘दृष्टी – 2019’ करण्यात आली होती.

स्पर्धेत श्री महावीर एज्युकेशन सोयायटीच्या महावीर पॉलीटेक्निक महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्या अजय कदम, कल्पेश गोंधळे, शुभम गोटे, अतुल देवरे या विद्यार्थ्यांनी आपल्या सादर केलेल्या प्रकल्पाच्या बळावर स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.

हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील ऍडमिट पेशंट्स ला गंभीर आजार स्थितीमुळे सकाळी जागेवरून हालचाल न करता तोंड धुणे, दात घासणे शक्य होत नाही.

अशावेळी जागेवरच या क्रिया करण्यासाठी बेसिन उपलब्ध करण्याची अभिनव कल्पना त्यांनी साकारली आहे. नाविन्य आणि उत्कृष्ठ सादरीकरणाच्या आधारे त्यांनी उपस्थित परीक्षाकाची मने जिंकली. त्यांना प्रा. राजीव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री राहुल संघवी, डीन डॉ. प्रियंका झवर, महावीर पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री संभाजी सगरे, प्रा. राजीव शिंदे, प्रा.पूजा भालेराव, प्रा. वर्षा गाढे, प्रा. नंदिनी खुटाडे जगदीश कोल्हे तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदींनी यावेळी त्याचे कौतुक केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!