Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये काल आढळून आलेल्या २८ रुग्णांची अशी आहे हिस्ट्री…

नाशिकमध्ये काल आढळून आलेल्या २८ रुग्णांची अशी आहे हिस्ट्री…

नाशिक |  प्रतिनिधी

नाशिक शहरात २८ कराेना बाधित रुग्णांची भर पडली आहे. राेजच नवे रूग्ण दाखल हाेत असल्यामुळे चिंतेत भर पडत आहे. काल नाशिकमध्ये चार बाधित रुग्णदेखील दगावले आहेत. लाॅकडाऊन शिथिल हाेत असताना राज्य शासनाच्या सूचनांनुसार मनपा प्रशासनाने ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. मात्र काळाची नाशिकमधील मुख्य बाजारातील गर्दी बघता धोक्याची घंटा असल्याचे एकूण दिसत आहे.

- Advertisement -

काल शहरातील ६० अहवालांपैकी २८ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यात गंगापूर राेड येथे एक रूग्ण, पंपिंग राेड १, पंडित काॅलनी १, दिंडाेरी नाका १, सरदार चाैक १, माडसांगवी १, सारडा सर्कल १, नाईकवाडी पुरा ३, पेठराेड २, पंडित नगर सिडकाे २, काेणार्क नगर १, माेठा राजवाडा ३, जुने सिडकाे १, देवळाली कॅम्प १, नागचाैक १, भवानी प्रसाद राे -हाऊस १, टाकळी राेड १, विधाते नगर, अशाेका मार्ग १, गुलमाेहाेर नगर, म्हसरूळ १, गंजमाळ १, सिन्नरफाटा १, राजेंद्र काॅम्प्लेक्स, नाशिकराेड १ असे २८ रूग्ण कराेनाबाधित आहेत.

शहरात आतापर्यंत ८१ प्रतिबंधित क्षेत्र झाले असून याठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. कालच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिक शहरातील रुग्णसंख्या ३४५ च्या घरात जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत शहरात १८ मृत्यू झाले आहेत. तर १३३ रुग्ण उपचार घेऊन करोनामुक्त झाले आहेत. सध्या नाशिक शहरात १९४ रुग्नणांवर जिल्वीहा रुग्नणालयात उपचार सुरु आहेत.

काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांची हिस्ट्री

१) नाईकवाडी पुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. २) दीपलक्ष्मी अपार्टमेंट श्रीधर कॉलनी, पेठरोड येथील २९ वर्षीय महिला व तिचा ३ वर्षाचा मुलगा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे जुन्या रुग्णच्या संपर्कातील आहेत.

३) पंडित नगर सिडको येथील ३२ वर्षीय महिला व तिचा ११ वर्षाच्या मुलाचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

४)कोणार्क नगर, जत्रा हॉटेल परिसर येथील ३३ वर्ष पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ५)मोठा राजवाडा वडाळा नाका येथील ५५ वर्षीय व्यक्ती जुन्या रुग्णाच्या संपर्कातील असून तिचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला असून त्याच कुटुंबातील ४५ वर्षीय महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच याच परिसरातील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

६)भुजबळ फार्म परीसर जुने सिडको येथील २७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही व्यक्ती आरोग्य सेवक असून मोरवाडी हॉस्पिटल येथील ॲम्बुलन्स वर वाहन चालक म्हणून कार्यरत.

७)पवार हाऊस, वीज मंडळ कॉलनी देवळाली कॅम्प येथील ५९ वर्षीय व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे.८) नाईकवाडी पुरा येथील ६५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

९) बालाजी सदन,नागचौक पंचवटी येथील ८५ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.१०) भवानीप्रसाद रो हाऊस गट नंबर १३६ येथील ३७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

११) जय भवानी नगर, टाकळी रोड,नाशिक येथील २८ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.१२) विधाते नगर,अशोका मार्ग येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

१३) मंगलमूर्ती अपार्टमेंट,गुलमोहर नगर, म्हसरूळ येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.१४)नाईकवाडी पुरा अजमेरी मजीद येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.१५) गंजमाळ येथील ३५ वर्षीय महिलेचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

१६) सिन्नर फाटा, नाशिक येथील ३५ वर्षीय महिला ही मुंबईहून प्रवास करून आलेली असून ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.१७)राजेंद्र कॉलनी नाशिक रोड येथील २४ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

१७) खतीब बंगलो,नाशिक येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१८) सरदार चौक,भोरे सदन येथील ४९ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मार्केट यार्डात त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १९) सह्याद्री नगर,पंपिंग रोड येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

२०) प्लॉट क्रमांक ६, दीपज्योती अपार्टमेंट,ठाकरे बंगला येथील ८३ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. २१) प्लॉट क्रमांक ८,सुप्रभात, रोहिणी नगर येथील ३४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे.

२२) पंचवटी टॉवर,रूम नंबर ३३ येथील ३६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. २३) नाईकवाडी पुरा अजमेरी मजीद,येथील ५० वर्षीय महिलेचे आज दि.०६/०६/२०२० रोजी निधन झाले आहे.

२४) अमन हाऊस मागील सुमन चंद्र बिल्डिंग,पखाल रोड,अशोका मार्ग येथील येथील ४१ वर्षीय व्यक्तीचे आज दि.०६/०६/२०२० रोजी निधन झाले आहे. २५) गंजमाळ येथील ४४ वर्षीय व्यक्तीचे आज दि ०६/०६/२०२० रोजी निधन झाले आहे.

२६)खोडे नगर,वडाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचे आज दि.०६/०६/२०२० रोजी निधन झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या