Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : मुथूट फायनान्स कार्यालयावर गोळीबार; एक ठार, तीन गंभीर

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील सिटी सेंटर मॉल जवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर अज्ञात लुटारूंनी गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत एक कर्मचारी ठार तर इतर तिघेजन जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुथूट फायनान्स कंपनीचे सिटी सेंटर मॉलजवळ कार्यालय आहे. याठिकाणी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांच्या टोळक्याने गोळीबार करत लुट करण्याचा प्रयत्न केला.

फायनान्स मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचे व ग्राहकांचे मोबाईल जमा करून घेतले. वाद घालत अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीतून पाच राउंड फायर केल्याचे  सांगितले जात आहे. संगणक अभियंता असणाऱ्या संजू सॅम्युअल (३२, केरळ) यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रशेखर भास्कर देशपांडे ( मँनेजर, ६४, रा. इंदिरानगर) व कैलास जयन (२५, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये फायनान्सचा मॅनेजर आणि वाचमनचा समावेश आहे. दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील फौजफाट्यासह दाखल झाले असून तपास सुरू आहे.

नुकतेच याठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दरोडेखोरांचा मागोवा घेऊन पोलीस तपासाला गती दिली जात असल्याची माहिती आयुक्त नांगरे पाटील यांनी दिली.

प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त नांगरे पाटील जखमींची भेट घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्याकडून घटनेची अधिक माहिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

दिवसाढवळ्या घातलेल्या दरोड्यात एक निष्पाप बळी गेल्यामुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस तपासाला गती देऊन शहराच्या सीमा बंद करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त पाटील यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!