आगामी वर्षात शहर बससेवा बंद होणार; एसटी महामंडळाकडून तोट्याचे कारण

0
नाशिक । शहरात प्रवाशी वाहतूक करताना ज्या मार्गावर वाहतूक सुरु असते. असे तोट्याचे मार्ग वाढत आहे. त्यामूळे शहरातील तोट्याच्या फेर्‍या बंद करण्यात येत असून, येत्या मार्च अखेर शहरबससेवा बंद करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.

महिन्याला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचे कारण एसटी महामंडळाने पुढे केले आहे. तोट्याच्या फेर्‍या बंद करण्यामागचे कारण हेच सांगितले जात आहे.

बससेवा बंद करण्याची चर्चा गत वर्षापासून शहरात सुरु असल्याने एसटी महामंडळ प्रशासन आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यात त्यामूळे वाद होत असल्याचे चित्र आहे.

कारण बसवाहक आणि चालकांना कपात केलेल्या फेर्‍यामुळे दिवस भरत नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये आहे.

शहर बससेवा मनपा चालविणार असल्याचे सुतोवाच करून एसटी महामंडळाने शहर बससेवेतून अंग काढून घेण्याचे धोरणगत वर्षापासून अवलंबले आहे.

त्यामूळे प्रवाशी, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनानेही एसटीच्या विरोधात आक्रमक भॅूमिका घेतलेली आहे. नेमके तोटा किती होत आहे, याची मागणी करणारे आंदोलन शहरातील पुरोगामी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी नुकतेच केले आहे.

LEAVE A REPLY

*