Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आषाढी एकादशी २०१९ : जिल्हाभरात विठ्ठलनामाचा गजर

Share

नाशिक : शहरासह जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठया भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शर्तीत तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांनी बालगोपाळांसह आषाढी एकादशी साजरीकेली. यावेळी बालगोपाळांनी विशेष पेहरावात पालख्या, दिंड्या काढून भक्तिमय वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.

रासबिहारी शाळेत आषाढी एकादशी उत्साहात संपन्न ….
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सत्रात विविध कार्यक्रम प्रस्तुत केले. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठ्लाचे अभंग व भजन प्रार्थनासभागृहात गाऊन विठ्ठलाप्रती आपला भक्ती भाव प्रकट केला. इ. ९वी च्या विद्यार्थीनी श्वेता साळवे आणि शताक्षी साळुंखे या दोघींनी आषाढी एकादशीचे महत्त्व सर्वांना अतिशय छान शब्दांत समजावून सांगितले.

विद्यार्थ्यानी पारंपारिक वेषभूषा करून उत्साहात दिंडी काढली. दिंडीमध्ये ‘ज्ञानबा तुकाराम’चा जयघोष करत मोठ्या जल्लोशात सर्व विद्यार्थी सहभागी झाले. शाळेचे संगीत शिक्षक श्री. सुभाष दसककर यांनी ताला – सुरात विद्यार्थ्यांना ‘विठ्ठल-विठ्ठल’ चा जागर करून वातावरण भक्तिमय केले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभंगाने अवघ्या शाळेतील वातावरण विठ्ठलमय झाले होते.

लोहोणेर। वार्ताहर : आषाढी एकादशी निमित्ताने येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील विठ्ठल मंदिरात सकाळी वेदमूर्ती भूषण पाठक यांच्या मंत्र घोषात चेतन पाठक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सायंकाळी हरिपाठ व पालखी सोहळा संपन्न झाला.

यावेळी विठ्ठल मूर्तीची भजनी मंडळा सुमधुर टाळ- मृदूंगाच्या गजरात लोहोणेर गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोहोणेर गावातील अबाल – वृद्धा सह महिला भाविकांनी श्री हरी पांडुरंगा चे दर्शन घेऊन लोहोणेर येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वनाथ पाठक, नाना पाठक, शामराव जोशी, शाम पाठक, मदन पाठक, रत्नाकर पाठक, ऋषिकेश बापट, मंगेश पाठक आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी येथील भजनी मंडळसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योगेश्वर विद्यालयात बाल वारकऱ्यांची दिंडी

दावचवाडी : येथे आज न्या.रा. वि. प्र. मंडळ संचलित योगेश्वर विद्यालय दावचवाडी च्या प्रांगणात आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्ताने विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून पांडुरंगाचा नाम घोष करत दिंडी आयोजित केली त्याच बरोबर पांडुरंगाचे भजन करणारे विद्यार्थ्यांनी रिंगण केले यावेळी विद्यार्थ्यांनी मनमुराद भजन, अभंग, ओव्या व फुगड्याचा आनंद लुटला

.

यानिमित्ताने माऊली वारकरी शिक्षण निफाड संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. राजेंद्र महाराज थोरात यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. माता-पित्याची सेवा करा, राष्ट्र कार्यामध्ये सहभागी व्हा, आणि देशाच्या प्रगतीसाठी ज्ञानमार्ग सोबतच अध्यात्म मार्गाचा अवलंब करा असा संदेश याप्रसंगी देण्यात आला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन…

स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित, इंग्रजी माध्यम रविवार पेठ या शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी आज आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नुतन कोतवाल यांच्या हस्ते पालखीचे व विठुरायाचे पूजन करण्यात आले.


प्रसंगी विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने वारकऱ्यांच्या वेशामध्ये विठूनामाचा जयघोष केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना एकादशी चे महत्व सांगून प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिंडोरी : पालखेड बंधारा येथे  दिंडी-पालखीचे आयोजन

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे सायंकाळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने तसेच ज्येष्ठ नागरिक नागरिकांच्या वतीने पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एकादशी निमित्ताने दरवर्षी पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडतो.

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास निघालेल्या दिंडीमध्ये बालगोपाळांनी अतिशय उत्साहात दाखवून टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये हा या सोहळ्यामध्ये रंग तभरून आणली यावेळी महिलांनीही हरिनामाचा गजर करत वेगवेगळी विठुरायाचे अभंग गायले तसेच वारकरी यावेळी बाल गोपाळांनी विविध वेशभूषा करून भगवे झेंडे हातामधे घेतली तर महिला वर्गाने तुळशीरुंद डोक्यावर घेऊन या दिंडीमध्ये सहभाग घेतला.

यावेळी गावातील सुवासिनींनी या दिंडी सोहळ्याचे भक्तिभावाने पूजन करून दर्शन घेतले या दिंडीची सांग ता मारुती मंदिराच्या प्रांगणात झाली ज्येष्ठांनीही अभंग गाऊन या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले याप्रसंगी नागरिकांबरोबर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!