Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिडको : मुलीच्या घशात अडकलेले नाणे काढण्यात यश

Share

नाशिक : एका सात वर्षीय मुलीने खेळताना एक रुपयांचे नाणे तोंडात टाकले. ते नाणे तिच्या घशात जावून अडकले. येथील नाक, कान व घसा तज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांनी दुर्बिणद्वारे किचकट शस्त्रक्रिया करून ते नाणे काढण्यात यश मिळविल्याने मुलीच्या पालकांनी सुटकेचा श्वास घेतला.

शहरातील सिडको येथील रिया देवरे या सात वर्षीय मुलीला गुरुवारी खेळत असतांना हातात असलेले रुपयाचे नाणे तिने तोंडात टाकले. त्यानंतर ते घशात अडकल्याने तिला श्वास घ्याल तसेच घास गिळतांना त्रास होऊ लागल्याने पालकांनी लागलीच जिल्हा रुग्णालयमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले.

डॉ संजय गांगुर्डे यांनी तपासणी केली असता नाणे घशात अन्ननलिकेत फसून असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या मुलीवर दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेनंतर ते नाणे काढण्यात डॉ. गांगुर्डे यांनी यश मिळविले. यामध्ये जिल्हा रुग्णालय नाशिक येथील भूलतज्ज्ञ डॉ चौधरी, डॉ तडवी, OT नर्स परदेशी व इतर स्टाफ यांनी सहकार्य केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!