Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिडकाे : भावाकडून भावावर कैचीने वार; संशयित ताब्यात

Share

नाशिक : सिडकाेतील त्रिमूर्ती चाैकजवळील पाटीलनगरच्या एका बाेळीत भावानेच भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. संशयितास ताब्यात घेतले असून गंभीर जखमीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान भावाने मद्य साेडावे या कारणातून हि घटना झाल्याचे प्राथमिक माहितीत समजते. दोन मद्यपी भावांच्या झालेल्या भांडणात एका भावाने दुसऱ्या भावाच्या मानेत कैची खुपसून त्यास गंभीररीत्या जखमी केले. सुयश जाधव हे हल्लेखोर भावाचे नाव आहे.

जखमी भाऊ ऋषिकेश जाधव याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. तर हल्लेखोर सुयश जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!