Type to search

Breaking News नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

बालदिन विशेष : आयुष्याच्या चक्रात बालक ‘दीन’च…

Share

बालदिन हा खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन अनेक देशांत साजरा होतो.

आज बाल दिन देशभरात शाळा, महाविद्यालयात, शहरात, गावात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पण शाळाच्या बाहेर, शहराच्या बाहेर, गावाच्या बाहेर झोपडीत अन दुसरीकडे सगळेच दिवस एकसारखी म्हणून फिरणारी लहान मुलं आपल्याला रस्त्यावर दिसून येतात.

आज राज्यात “Right to education मुळे प्रत्येक मुलं सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण घेत आहे. पण आजही याच वयातील ‘त्या’ मुलांना आपल्या या हक्काबद्दल माहिती नाही. एकीकडं नवीन युनिफॉर्म -नवीन बेल्ट- नवीन कंपास घेऊन मुले शाळेला जात आहेत. उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करीत आहेत, परंतु दुसरीकड तोच शर्ट तीच पॅन्ट अन तेच पोटासाठी फिरणं अजूनही थांबलेल दिसून येत नाही. इंग्रजी , मराठी शाळा मधील अनेक मुलं आलिशान कारमधून उतरून शाळेत पळत जाताना दिसतात तर त्याच शाळेसमोर मधल्या सुट्टीत काही तरी विकत बसणारी लहान मुलं आपल्याला केविलवाणी वाटतात. खर तर आपले विचार बालककेंद्री होणं गरजेचे आहे

शहरात रस्त्यावर अनेक मुलं सिग्नल थांबल्यावर पैसे मागताना दिसतात. काहीजण त्यांना पैसेही देत असतात. परंतु पैशाने त्येवळची भूक भागणार आहे. त्यांचा जगण्याचा प्रश्न तसाच अनुत्तरित राहणार आहे. पण त्यावेळी मुलांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघितल्यावर लक्षात येत भुकेची किंमत काय आहे ते. या मुलाच्या वाट्याला शालेय शिक्षण कधीच येत नसते. यासाठी काही ठिकाणी सिग्नल शाळेचा प्रयोग देखील करण्यात आला आहे. परंतु या बालकांच्या जीवनात कुठलाही बालक दिन साजरा झाला नाही.

शालेय शिक्षणापासून दूर राहिलेली मुले शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेतरी काम करताना दिसतात. यातील बहुतांशी मुलांवर केवळ परिस्थितीमुळेच काम करण्याची वेळ येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिक्षणापासून वंचित, इतर सुख सुविधांचा अभाव यामुळे या गोष्टी निर्माण होतात. बालकामगार संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेने आवश्यक तो आराखडा करणे गरजेचे आहे. परिणामी बाल दिन कुणासाठी साजरा करायचा हा यक्ष प्रश्न पुढे उभा राहतो.

एकूणच समाजातील प्रत्येक मुलं हे देशाचे उद्याच भविष्य आहे. शहरातील , ग्रामीण भागातील, रस्त्यावरील, बालकामगार प्रत्येकाचे स्वप्न असतं. गरज आहे ती स्वप्नांना उभारी देण्याची , ती आपण कोणत्याही सम्यक मार्गाने पूर्ण करणे गरजेचे आहे.

  • गोकुळ पवार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!