Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : ऑनलाइनच्या माध्यमातून दोन लाखांची फसवणूक; तिघांना अटक

Share

नाशिक : ‘तुमचे एटीएम बंद झाले आहे. एटीएम कार्डचा क्रमांक द्या, असे सांगत एका नाशिक येथील एका युवकाच्या बँक खात्यातील पावणे दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संबंधी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, नाशिकरोड येथील नंदू भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १२ नोव्हेंबर २०१८ ते २१ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत भिसे यांना एक कॉल आला. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. नवे कार्ड मिळविण्यासाठी जुन्या कार्डचा नंबर द्या, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर आम्ही तुमचा मोबाईल नंबर क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी एक कोड पाठवीत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले.

त्यानंतर भिसे यांनी त्यांना कोड सांगितलं. परंतु कोड सांगण्यात तुम्ही जास्त वेळ घेत आहात त्यामुळे तो अवैध होऊन जात आहे, असे सांगून भिसेकडून कोड मागितले. या दरम्यान भिसे यांच्या एसबीआय खात्यातून १लाख ८९ हजार तीनशे ८६ रुपये ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून परस्पर काढून घेऊन भिसे यांची फसवणूक केली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भिसे यांनी पोलिसांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. त्यानंतर निशांत कुमार ओमप्रकाश सिंग (२३), मोहम्मद रयाझउद्दीन फैजल (२२), तरुण कुमार श्याम सिंग अशी संशयितांची नावे आहेत. या तिघांना दिल्ली येथे सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

यांच्याकडून १० मोबाईल, ०१ फिंगर प्रिंट स्कॅनर, आयडिया कंपनीचे एकूण ३२ सिमकार्ड, वोडाफोन कंपनीचे एकूण १५ सिमकार्ड, एअरटेल कंपनीचे एकूण ३४ सिमकार्ड व रुएए १० हजार रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!