राज्य शासनाचा तंटामुक्ती पुरस्कार चापड़गावला जाहीर

0

नाशिक,  ता. २३ : बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यामधील चापड़गाव या सुमारे दीड हजार लोकवस्ती असलेल्या गावाला राज्य शासनाचा तंटा मुक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. पोलिस उपअधीक्षक दीपक गिर्हे यांचे कडून रुपये दोन लाख किमतीचा धनादेश यावेळी सरपंच राजेन्द्र दराडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

गावाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केलेल्या कार्याची पावती मिळाली तसेच चापड़गाव एक आदर्श गाव म्हणून तालुक्यात ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रया यावेळी सरपंच राजेन्द्र दराडे यांनी दिली.

यावेळी पोलिस पाटिल रमेश आव्हाड, तंटा मुक्ती अध्यक्ष भाऊलाल दराडे, भगवान् दराडे, बाबूदादा दराडे, बबनराव दराडे, अतुल दराडे, गणेश दराडे, शांताराम दराडे, सुभाष पवार, कैलास शिंदे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*