वन्यजीवांनाही दुष्काळाची आत्तापासूनच झळ

0

चांदवड प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील दिघवद परिसरात सध्या माकडांनी मुक्काम ठोकला आहे. डोंगरात जलसाठे आटल्याने वन्यजीवांनी आपला मोर्चा सध्या शहराकडे वळवला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसापासून माकडांनी दिघवद परिसरात मुक्त संचार सुरु केला असून गावकरी देखील त्यांचा पाहुनचार करताना दिसत आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा असताना वन्यजीवाची हि परिस्थिती उन्हाळ्यात किती गभीर वळण घेईल याची प्रचीती येते. यामुळे संबधीतविभागाने याकडे आत्तापासून गाभिर्याने बघण्याची गरज आहे. दिघवद येथील शेतकरी माधव गांगुर्डे यांच्या शेततळ्यावर ही माकडे अनेकदा पाणी पिताना दिसून येत आहे त्यास ते कुठलाही प्रतिबंध करत नसले तरी कागदावरून तोल जाऊन हि माकडे पाण्यात पडण्याची त्याना भीती वाटते.

कारण यामुळे माकडांच्या जीवाला धोका आहेच पण मर्कटलीला शेततळ्याचा कागद देखील फाडू शकता तसे झाल्यास पाण्याची नासाडी ती वेगळी अन आर्थिक फटका बसेल तो वेगळा. यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.

LEAVE A REPLY

*