Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चांदवड : छत्रपती सेनेने भागवली तिसगावकरांची तहान

Share

चांदवड प्रतिनिधी : चांदवड तालुक्यात दुष्काळाचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली असून अनेक गाव वाड्यांची भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे. टँकरची वाट बघणं आणि त्यातून पाणी काढण्यासाठी उडणारी झुंबड बघून भविष्यातील पाणीबाणी परिस्थितीची झलक दिसून येते. अशातच आता तालुक्यातील तिसगाव येथे देखील पाणी टंचाईने उग्र रूप धारण केल्याचे लक्षात येताच छत्रपती सेनेने तात्काळ येथे टँकरने मोफत पाणी वाटप केले.

तालुक्यात अगोदरच सरासरीपेक्षा फक्त ४०% इतके कमी पर्जन्यमान झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई आहे. शेतकऱ्यांचे तर तीन हंगामा ऐवजी एकच हंगाम कसातरी निघाला आहे. यानंतर सर्व धावपळ सुरू झाली ती उपलब्ध पाणी जपून वापण्यासाठी त्यातही विहीर, कूपनलिका कोरडयाठाक पडू लागल्याने नागरिकांसोबतच जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला.

मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी वणवण सुरू झाल्याने अनेक गावांत तर दिवस-आड अंघोळीचा प्रयोग राबवत पाणी टंचाईवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. अशात प्रशासनाकडून पाणी टँकर सुरू असले तरी सामाजिक बांधिलकी म्हणून छत्रपती सेनेकडून तिसगाव ता. चांदवड येथे टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यात आला.

यावेळी छत्रपती सेनेचे संस्थापक चेतन शेलार, सरपंच कैलास खैरे, उपसरपंच हिराबाई गांगुर्डे, तुषार गवळी, छत्रपती मुस्लिम आघाडीचे अस्लमभाई लालू, किरण नाईक, राजेंद्र गांगुर्डे आदी. उपस्थित होते. तिसगावकरांच्या वतीने नवनाथ गांगुर्डे यांनी छत्रपती सेनेचे आभार मानले.

पाणी टँचाई हे आपल्या समोरील मोठं संकट आहे. फक्त प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा समाजातील ज्या संस्थांना, सामाजिक कार्यकर्त्यांना दुष्काळग्रस्त भागातील लोकांची तहान भागविण्यासाठी जे काही करता येईल ते करायला हवं. छत्रपती सेनेच्या माध्यमातून आम्ही शक्य होईल तितक्या प्रमाणात लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत.
– चेतन शेलार, छत्रपती सेना.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!