Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चांदवड तालुक्यातील राजडेरवाडी सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

Share

चांदवड प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१०)रोजी घडली.

राजदेरवाडी येथील साजन धोंडीराम पवार हा आठ वर्षीय बालक पालक चांदवड येथे बाजारानिमित्त गेले असल्याने आपल्या घराजवळ खेळत असताना त्याला दुपारी साडेतीन वाजता सर्पदंश झाला. मात्र हा प्रकार शेजारी व नातेवाईकांच्या बाजारातून आल्यानंतर लक्षात आला त्यांनी बालकाला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथे वैद्यकीय अधीक्षक राजपूत व डॉक्टर पालवे यांनी त्यास मृत घोषित केले.

याबाबत चांदवड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान नातेवाईकांच्या वेळीच लक्षात आले असते तर उपचार मिळून साजन याचा जीव वाचू शकला असता अशी चर्चा सुरू होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!