चांदवड : निंबाळे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी

0

काजी सांगवी वार्ताहर : चांदवड तालुक्यातील निंबाळे शिवारात पाटोळे वस्तीवर व चितनार वस्ती या शिवारात बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये दत्तू बाळू निमसे, निंबाळे प्रमोद सोमवंशी तळेगाव या दोन्हींवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये दोघेही जखमी झालेले आहे

दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेमुळे निंबाळे व तळेगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी हरिभाऊ सोनवणे, सचिन सोनवणे, अर्जुन सोनवणे यांनी परिस्थितीचा सामना करून दोघांचे प्राण वाचवले.

LEAVE A REPLY

*