Type to search

वडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास

Breaking News नाशिक मुख्य बातम्या सेल्फी

वडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास

Share

विकास काळे । चांदवड : वडाळीभोई ता.चांदवड येथील कन्या तर मानोरी ता.येवला येथील सुनबाई सौ.चित्रा रामराव शेळके यांनी पहिल्या महिला रिक्षा चालक, कंडक्टर व बसचालक होण्याचा मान मिळवत नवी मुंबई येथे भरारी घेत अनेक महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे.

वडाळीभोई येथे चित्रा शिर्के यांचे शिक्षण जेमतेम बारावी पर्यंत झाल्यावर २००२ मध्ये मानोरी बु.ता.येवला येथील रामराव किसन शेळके यांचेशी विवाहबद्ध झाल्यानंतर चित्रा शेळके यांनी नवी मुंबई ऐरोली येथे २०१४ मध्ये आपले पती यांना विश्वासात घेत महिलांना प्रवासासाठी होणारी अडचण स्पष्ट करत स्वतः रिक्षा चालवण्या आग्रह धरून रिक्षा चालक होवुन महिलांना सेवा देण्याचा निश्चय केला.

आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालवणे शिकली. दोन अडीच वर्षे नवी मुंबई ऐरोली येथ रिक्षा लाईनमध्ये काम करताना २०१५ मध्ये कंडक्टर चा भरलेला नोकरी अर्जाचा कॉल २०१६ मध्ये आला. तेथे मुलाखत दिल्यावर सिलेक्शन झाले. कंडक्टर मध्ये नियुक्ती झाली तरी पार्ट टाइम म्हणून रिक्षा चालवली. कंडक्टर चे काम करत असताना बस ड्रायव्हींग करण्याचा विचार आला.

किमान बसचालक झाले तर स्वतः स्कुल बस घेवू यासाठी टेस्ट देण्यापुरते हेवी लायसन्स काढून ठेवले. योगायोगाने कंडक्टर काम करत असताना महिला बसचालक पाहिजे अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. २०१६ मध्ये बसचालक फॉर्म भरला, मुलाखतही दिली. ट्रॉफीकमध्ये मोठी गाडी चालवली नसल्याने मोठी कसरत करावी लागली. बसचालक सिलेक्शन झाले तेव्हा ४० पुरूष व चित्रा एकटी महिला होती.

प्रशिक्षक अब्दुल काझी यांनी वेळोवेळी प्रेरणा देत बसचालकाचे शिक्षण यशस्वीपणे दिले.त्यामुळे महाराष्ट्रातील पहिली महिला बसचालक होवू शकले असे चित्रा सांगते. सध्या तुर्भे डेपोत तेजस्विनी बसचालक म्हणून कार्यान्वित आहे.रिक्षाने हक्काचा रोजगार उपलब्ध झाला याचा अभिमान आहे.

८ मार्च २०१९ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गौरव होवून पुरस्कार देण्यात आले. त्यात स्त्री सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार २०१९, स्त्री सन्मान पुरस्कार मुलुंड – ऐरोली (नवी मुंबई ) आदी अनेक पुरस्कार व गौरव मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!