Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

किराणा दुकानातून गावठी दारू बनावटीचा मुद्देमाल जप्त

Share

चांदवड । प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील निमोण येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोरील रामदेवजी किराणा दुकानात मनमाड पोलिसांनी छापा टाकीत गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे गुळ, तुरटी, इस्ट असे एकूण १ लाख ८७ हजार ७६५ रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या संदर्भात मनमाड येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई पृथ्वीराज बारगळ यांनी फिर्याद दिल्याने दुकानमालक ललीतकुमार शांतीलाल चोरडीया (३५) यांच्या विरोधात मुंबई प्रोव्हीविशन कायद्याअंतर्गत चांदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड तालुक्यातील निमोण येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोरील रामदेवजी किराणा दुकानात अवैधरीत्या गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नवसागर, गुळ, इस्ट, तुरटी आदींचा दुकानदाराने साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मनमाडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांना शनिवार (दि.१) रोजी मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सहा. पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी सहा. पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर थोरात, पोलीस शिपाई प्रशांत पाटील, महिला पोलीस शिपाई दिपाली बदादे, मंदा बोरसे आदींना निमोण येथील किराणा दुकानावर छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. मात्र सदर दुकान बंद होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुकान मालक ललितकुमार शांतीलाल चोरडिया (३५) हे निमोणला आल्यावर त्यांनी दुकान उघडले.

दुकान उघडताच मनमाडच्या पोलीस पथकाने दुकानावर छापा टाकला असता दुकानात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याचा साठा केलेले आढळून आले. यात १ लाख ८० हजार २५० रुपये किमतीचे गुळाच्या ५१५ भेल्या (प्रत्येकी १० किलो वजनाच्या व प्रत्येकी ३५० रुपये किमतीच्या), २८५ रुपये किमतीचे प्रेस्टीज प्रेश बेकर्स इस्ट नावाचे (प्रत्येकी ५०० ग्रम वजनाचे ५ नग, एक पॅकेट प्रत्येकी ५७ रुपये किमतीचे), १६० रुपये किमतीचे तुरटीचे १६ नग (प्रत्येकी १० रुपये किमतीचे) व ७०७० रुपये किमतीचे सफेद रंगाचे नवसागरच्या एकूण ७०७ वड्या (एका वडीची किमंत अंदाजे १० रुपये) असा एकूण १ लाख ८७ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल मनमाडच्या पथकाने जप्त केला आहे.

या घटने संदर्भात मनमाड येथे कार्यरत असलेले पृथ्वीराज बारगळ यांनी दुकानमालक ललितकुमार चोरडिया यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने मुंबई प्रोव्हीविशन कायद्या अंतर्गत चांदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!