चांदवड : दुगाव येथे घरफोडीत १ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास

0

चांदवड प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील दुगाव येथील बंद घराची घरफोडी करून चोरटयांनी एकूण १ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ता. १३ रोजी उघडकीस आली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुगाव येथील रहिवाशी डॉक्टर प्रशांत सोनवणे हे आई वडिलांना नाशिक येथे वैद्यकीय उपचारासाठी घेऊन गेले होते. जातेवेळी घराला कुलूप लावून गेले मात्र ता. १३ ला गावातील घराचा दरवाजा तोंडल्याची माहिती प्रवीण बच्छाव यांनी डॉक्टर सोनवणे यांना भ्रमणध्वनी द्वारे दिली.

यानंतर गावातील पोलीस पाटील रवींद्र सोनवणे यांच्यासह शँकर सोनवणे, अनिल सोनवणे यांनी जाऊन घराची पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. हे कळताच डॉक्टर सोनवणे यांनी तातडीने घरी धाव घेतली असता घरातील साहित्य अस्त्याव्यत अवस्थेत दिसले.

चोरटयांनी रोख स्वरूपातील ७ हजार रुपये तर ४ तोळे सोन्याची पोत, २ तोळे सोन्याचे लॉकेट, दीड तोळे सोन्याच्या तीन अंगठ्या, पाच हजार किंमतीच्या साड्या असा एकूण १ लाख ८२ हजराचा ऐवज लंपास केला. याबाबत चांदवड पोलिसात डॉक्टर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे.

LEAVE A REPLY

*