Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Share
file photo

नाशिक : नाशिकसह जळगाव, नंदुरबार, पुणे व घाट परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोरडे हवामान असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान काही दिवस गायब झालेला पासून नव्याने सक्रिय होणार असून पुढील दोन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवान विभागाने व्यक्त केला आहे.

तसेच पुण्यासह घाट परिसरातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पूरपरिस्थिती भागाला काहीसा दिलासा मिळत असतांना पुन्हा पाऊस होणार यामुळे समस्या वाढण्याची शक्यता आहे. पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने कोल्हापूर जिल्हा पुराच्या संकटातून हळूहळू सावरत आहे. पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 (NH-4) वरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, ती पूर्वरत करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!