प्रतिबाळासाहेब ठाकरे होणे कठीण : भुजबळ

छगन भुजबळ.यांची चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया

0

नाशिक : ‘बाळासाहेब ठाकरे असते तर अमित शहांची शिवसेनेविरोधात बोलण्याची हिंमत झाली नसती’ अशी प्रतिक्रिया चित्रपट पाहिल्यानंतर माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत विशेष योगदान देणाऱ्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे या चित्रपटाचे खास प्रदर्शन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित नाशकात झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या चित्रपटाचे एक विशेष प्रदर्शन बिग बझार येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आले होते.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील, स्व.वसंतराव नाईक, बॅ.ए.आर.अंतुलेंपासून तर शरदचंद्रजी पवार व स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिले आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जनतेच्या हिताच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्य पणाला लावले. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या कार्याचा प्रवास त्यांच्या जीवनपटावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटातून जनतेच्या समोर मांडण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*