Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे; नाताळनिमित्त सजली शहरातील चर्च

Share

नाशिक । प्रतिनिधी
नाताळनिमित्त शहरातील विविध चर्च सजली आहेत. ख्रिसमच्या पूर्वसंध्येला रात्री होली क्रॉस चर्च, डॉन बॉस्को चर्च व सेंट आंद्रिया चर्चमध्ये प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ताला-सुरातील मराठी व इंग्रजी भाषेतील धार्मिक गाणी सादर करून प्रभू येशू जन्माच्या शुभेच्छा ख्रिस्तीबांधवांनी एकमेकांना दिल्या. नाताळनिमित्त चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, चर्चचे सुशोभिकरण व प्रभू येशू ख्रिस्त जन्माचा देखावा (गव्हाणी) तयार करण्यात आला आहे. सोमवारी (दि.24) मिस्सासाठी ख्रिस्तीबांधवांनी चर्चमध्ये गर्दी केली होती.

जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे’ असे म्हणत प्रभू येशूच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. त्र्यंबक नाका चौकातील होली क्रॉस चर्चमध्ये प्रभू येशू जन्माचा देखावा साकारल आहे. ख्रिस्तीबांधवांनी यावेळी रात्री नऊला कॅरल सिंगिग सादर केले. प्रभू येशूचा जन्म मिस्सा मराठी आणि इंग्रजीत झाला. फादर वेन्सी डिमेलो, फादर लॉइड सांब्र्या, फादर केनेथ डिसूझा, फादर राकेश घावटे, फादर ब्रायन बांड्या, फादर टेरेन्स यांच्या उपस्थितीत प्रार्थना झाली. ग्लोरिया…ग्लोरिया यांसह विविध भक्तीगीतातून सामुहिक गायन करत ख्रिस्तीबांधवांनी प्रभू येशूचे स्मरण केले.

संत आंद्रिया चर्चमध्ये रेव्हरंड अनंत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मिस्सासाठी ख्रिस्तीबांधवांनी सोमवारी रात्री गर्दी केली होती. सामुहिक प्रभू येशूची उपासना करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संत आंद्रिया चर्च परिसरात आकर्षक बाळ येशूचा जन्मोत्सव देखावा एम्बॉसिसची कलाकृतीत व गव्हाणीत साकारण्यात आला आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

ख्रिसमस ट्रीची अनोख्या पध्दतीने केलेल्या सजावटी यंदा लक्षवेधी ठरली आहे. प्रभू येशूच्या जन्माचे आनंदोत्सव केक वाटून करण्यात आला. त्यामुळे आवडीच्या फ्लेवरचा केक घेण्यासाठी ख्रिस्तीबांधवांनी गर्दी केली. पाहुण्यांचे स्वागत केक देऊन करण्याची प्रथा ख्रिस्ती आहे.

…म्हणून 25 ला नाताळ 
नाताळ किंवा ख्रिसमस सण दरवर्षी 25 डिसेंबर दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार हा सण 12 दिवसांच्या ’ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. इ.स. 345 वर्षांतील पहिले पोप ज्युलियस यांनी ’25 डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा, असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!