Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

दत्तक’ नाशिक मंत्रिपदापासून ‘वंचित’; आयारामांना मानाचे पान

Share

नाशिक । प्रतिनिधी
राज्यमंत्री मंडळ विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दत्तक’ नाशिकला सापत्न वागणूक दिली असून मंत्रिपदापासून वंचित ठेवले आहे. युती सरकारचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होता. शेवटच्या चार महिन्यांसाठी का होईना, तिघांपैकी एका आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ठेंगा दाखवत नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली.

पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (दि.17) सुुरुवात होत असून त्यापूर्वी रविवारी मंत्रिमंडळाचा विस्ताराचा बार उडविण्यात आला. त्यामध्ये पाच कॅबिनेट व आठ राज्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नाशिकला नाही कॅबिनेट निदान राज्यमंत्रीपद मिळेल, ही अपेक्षा होती. मागील साडेचार वर्षांत मंत्रिपदाची चर्चा सोडली तर मंत्रिमंडळत विस्तारात नाशिककरांचा हाती भोपळा आला. यंदा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असून नोव्हेंबर महिन्यापूर्वी राज्ंयात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहे.

त्यामुळे शेवटच्या चार महिन्यांसाठी का होईना, तीन आमदारांपैकी एकाला राज्यमंत्रिपदाची संधी देऊन मुख्यमंत्री ‘दत्तक’ नाशिकला न्याय देतील, ही अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षातून आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. शहरात एकावेळी तीन आमदार व महापालिकेत एक हाती सत्ता देऊनही मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.

त्यामुळे उघड नव्हे, पण तिन्ही आमदार खासगीत नाराजी व्यक्त करत आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत आ. बाळासाहेब सानप व आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्यात शर्यत होती. मात्र, दोन्ही आमदारांतील गटबाजी व कलहदेखील मंत्रिपद नाकारण्याचे प्रमुख कारण असल्याचे समजते. शिवाय दोघांचीही आमदारकीची ही पहिलीच टर्म असल्याने त्यांना मंत्रिपद देण्यास नकार दिल्याचे कळते.

मंत्रिमंडळात अनुभवी लोकांना स्थान देण्यात आले. मंत्रिमंडळात नाशिकचे प्रतिनिधित्व पालकमंत्री गिरीश महाजन करत आहेत.
– बाळासाहेब सानप, आमदार, भाजप

भाजपने मंत्रिमंडळात नाशिकला स्थान न देता अवहेलना केली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार केला गेला.
– शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

मुख्यमंत्र्यांनी दत्तक नाशिकला सापत्न वागणूक दिली आहे. हे राज्य मंत्रिमंडळ विस्तारातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
– रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!