Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : कळवणकरांचा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात पाईपलाईनचे काम सुरु

Share

कळवण । प्रतिनिधी : सटाणा नळपाणीपुरवठा योजनेला कळवण तालुका वासियांचा विरोध कायम असतांना सटाणा नगर परिषदेने कोर्टाचा आदेश आणून आज दि २८ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात केली आहे. कळवण तालुका कृती समितीने आज काळा दिवस घोषित करीत जयदर येथे पोलीसांसमोर निषेध आंदोलन केले.

कळवण तालुका कृतीसमिती व सटाणा नगर परिषदेचे पदाधिकारी यांची ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सटाणा नळपाणीपुरवठा योजनेला विरोध करणाऱ्या कळवण तालुका कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणातील पाणी सटाणा वासियांना पिण्यासाठी देण्यास विरोध नाही. परंतु ज्या हेतूने धरणाची निर्मिती झाली आहे. त्या तालुक्यातील सिंचनाचा प्रश्नाचा सटाणा नगर परिषदेने सन्मान करावा व पाणी सुळे डावा कालव्याद्वारे घेऊन जाऊन खामखेडा, ठेंगोडा या परिसरात लघु प्रकल्प बांधून त्यात टाकावे तेथून पाईपलाईनने पाणी उचलावे असे सुचवले होते.

मात्र सटाणा नगरपरिषद व नागरिक पाणी थेट पाईपलाईननेनेले जाईल या भूमिकेवर ठाम राहिल्याने हि बैठक कोणत्याही निर्णयाविना संपविण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपण स्वतः पाहणी करून शासनाकडे दोनही बाजूचे म्हणणे शासनाला कळवू असे उपस्थितांना सांगितले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा करूनही वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत आज सकाळी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात कामाला सुरुवात करण्यात आले.

खंडकी फाटा, जयदर येथे धरणापासून सहा किमी लांब पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. त्या ठिकाणी कळवण तालुका कृतीसमितीने आंदोलन करून आपला विरोध दर्शविला . यावेळी पाणी आमचे हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, पाणी देणार पाटानेच , शासनाच्या दडपशाही धोरणाचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलान केले.

यावेळी सर्व आंदोलकांना अटक करण्यात आली. त्यानंतर आंदोलक कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार, जि प सदस्य नितीन पवार, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, राजेंद्र भामरे, आण्णा शेवाळे, बाळासाहेब शेवाळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, माकपा सरचिटणीस हेमंत पाटील, मोहन जाधव, प्रवीण रौंदळ, विलास रौंदळ, कारभारी आहेर, संदिप वाघ, जितेंद्र वाघ, रामा पाटील, पंकज जाधव, गंगाधर शेवाळे, विलास रौंदळ, शांताराम जाधव, काशिनाथ गुंजाळ, मोहन भिला जाधव , दादाजी बोरसे, हेमंत पगार, संजय मोरे, दिलीप हिरे, रामदास पाटील, पंकज मन्साराम जाधव , महेंद्र शिवाजी जाधव पोलीस व्हॅन मध्ये अभोणा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी पाच वाजे पर्यंत स्थानबद्ध ठेवून सोडून देण्यात आले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त –
कळवण तालुकावासीयांचा विरोध पाहता या पूर्वी झालेली आंदोलने यांचा विचार करून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी धरणाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गावर चोख पोलीस बंदोस्त ठेवला होता. या ठिकाणी शीघ्र कृती दलाच्या तीन तुकड्याना पाचारण करण्यात आले होते.

सटाणा नगर परिषद पदाधिकारी व शासनाने आमची फसवणूक केली आहे. आम्हाला एकीकडे बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन देत राहिले व दुसरीकडे न्यायालयातून पोलीस बंदोस्तात पाईपलाइन करण्याचा आदेश आणला आहे. मुळात पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जेव्हडे पाणी आरक्षित केले आहे. त्यापेक्षा जास्त पाणी देण्याची आम्ही तयारी दाखवली होती. फक्त पाणी पाटचारीने घेऊन जाण्याचा आमचा आग्रह होता. त्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबाना जीवदान मिळणार होते.
-देविदास पवार – कृती समिती अध्यक्ष

कोर्टाचा आदेश पुढे करून शानाने कळवणकरांचा सविश्वास घात केला आहे. पाइपलाईनने पाणी नेने म्हणजे शेतकऱ्याचा खून करून रक्त नेण्यासारखे आहे. आधीच शेतमाल कवडीमोल भावात विकला जात आहे. असे असतांना पाईपलाईनमुळे पुनंद खोऱ्यातील बागायती शेती उध्वस्त करून कळवण तालुक्यात शेतकरी आत्महत्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सटाणा नगर परिषद व शासनाने केले आहे.
-अंबादास जाधव – शिवसेना तालुकाप्रमुख 

सटाणा वासियांना चुकीची माहिती देऊन पाइपलाईनद्वारे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी देण्यास पिण्यासाठी पाणी देण्यास कळवण वासियांनी कधीच विरोध केला नाह. पहिल्या दिवसापासून पाणी देणार आहे. फक्त पाणी कॅनॉलद्वारे घेऊन जावे एव्हडीच प्रामाणिक मागणी कळवण तालुकावासीयांची होती.
-नितीन पवार – जि प सदस्य 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!