Type to search

Breaking News कृषिदूत नाशिक मुख्य बातम्या

पेरणीसाठी बियाणे खरेदी करताय ? मग हे वाचाच

Share

नाशिक : राज्यात पावसाला सुरवात झाली असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामाची सुरूवात येत्या काही दिवसात होत आहे. या काळात शेतीला लागणाऱ्या बी-बियाणांना अधिक मागणी असते. परंतु बियाणे घेताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेतले पाहिजे.

आज मोठ्या प्रमाणावर बियाणांची दुकाने बाजारात दिसून येतात. बऱ्याचवेळा बियाणांचे अधिकृत शॉप नसतात. त्या ठिकाणी सीलबंद बियाणे मिळाले तरी त्या उत्पादनाची तिथी समाप्त झाली असते. यासाठी बाजारातून बियाणे खरेदी करत असाल तर योग्य ती पारख असायलाच हवी अन्यथा फसगत होऊ शकते.

शेतीतील अनेक उत्पादनासाठी बियाणांची आवश्यकता असते. याच धर्तीवर राज्यात हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. सदर कंपन्यांना शासनाचा कोणताही परवाना नसतांना बियाणे विक्री करताना दिसून येतात. अशा बोगस कंपन्यांकडील बियाणे योग्य त्या पात्रतेचे नसल्याने जमिनीची उत्पादन क्षमता खालावते. त्यामुळे या कंपन्यांनी कोणतेही आश्वासन दिले तरी शेतकऱ्यांनी या आश्वासनांना बळी पडू नये.

दरम्यान शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये पुढील घटक लक्षात ठेवावे.
▪ भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पॉकिट सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी.
▪ पॉकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी.
▪ सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावी.
▪ बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी.

▪ बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पॉकिटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.
▪ बोगस बियाणांविषयी काही तक्रारी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

ग्रामीण भागातील शेतकरी बियाणे घेतांना बऱ्याचवेळा पक्के बिल न घेता ढोबळ कागदावरील बिल घेतात. यामुळे काय होत कि, खासगी बियाणे कंपन्या दुकानदाराला मोठ्या प्रमाणात मार्जिंन देत असल्यामुळे बऱ्याचवेळा विक्रेते छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीत बियाणे उपलब्ध करून देतात. मात्र बिल मूळ न देता बनावट बिल देतात.

या बिलाच्या माध्यमातून ते शेतकऱ्याकडून अधिक पैसे घेतात व मूळ बिलावर मात्र कमी किंमत लिहितात. यामध्ये शेतकरी व शासनाची लूट होते. त्याचबरोबर बियाणे व्यवस्थित न आल्याने पक्के बिलच नसल्याने दुकानदाराला जाब विचारता येत नाही. तर अशा वेळी बिलाची मूळ प्रत आणि बियाणांची पिशवी आवश्यक ठरते. यामुळे ते कंपनीकडे झालेल्या नुकसानीचा दावा करू शकतात. त्यामुळे शक्यतो मूळ बिलाची मागणी करावी

बियाणे तक्रार निवारण केंद्र :
शेतकऱ्यांना खात अथवा बियाणांबाबत काही माहिती हवी असल्यास किंवा तक्रार करावयाची असल्यास कृषी विभागाने टोल फ्री उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच खत आणि बियाणे वाटपात अधिक पारदर्शीपणा आणण्यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतला असून १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!