नाशिकच्या प्रवासासाठी आता वाकडेवाडीत बसस्थानक; हे आहे कारण

jalgaon-digital
2 Min Read

Photo : Cheatan dani 

पुणे मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर

नाशिक । प्रतिनिधी

मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे पुण्यातील शिवाजीनगर येथील येथील एसटी महामंडळाचे बसस्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे आज दि.३१ पासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ व मराठवाड्यासाठी सुटणाऱ्या बसेस वाकडेवाडीतून सोडण्यात येणार आहेत. शिवाजी नगर येथील वेळापत्रकानुसारच वाकडेवाडी येथील तात्पुरत्या बसस्थानकातून निर्धारित मार्गावरील फेऱ्या सुरु सुरु राहतील असे एसटीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथील एसटीचे स्थानक कार्यरत आहे. पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आल्यावर हे बसस्थानक तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शिवाजीनगर येथे बस्थानकाच्या जागेत भुयारी मेट्रो स्टेशनसह अद्ययावत बसस्थानकाची उभारणी होणार होणार आहे. त्यामुळे या बसस्थानकातून नाशिक, मुबई सह राज्याच्या विविध भागात सोडण्यात येणाऱ्या बससाठी वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राच्या जागेत तात्पुरत्या स्थानकाची उभारणी करण्यात आली असून तेथे प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वाकडेवाडी येथील बसस्थानकातून आज दि.३१ पासून निर्धारित बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतर गेल्या आठवड्यातच करण्यात येणार होते. मात्र ख्रिसमस आणि दोन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत, त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे स्थलांतर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली.

सध्या शिवाजीनगर बसस्थानकातून दररोज सुमारे १४०० बस ये-जा करतात. औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, अकोला, गेवराई, बीड, लातूर, पणजी यांसह उत्तर महाराष्ट्र , विदर्भ व मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून या बस ये-जा करतात. या सर्व बस आता वाकडेवाडी स्थानकातून सुटतील. यापैकी एकही बस शिवाजीनगरकडे येणार नाही. वाकडेवाडी येथे एकूण १९ फलाट उभारण्यात आले आहेत. या नवीन बसस्थानकातून नाशिक फाट्याकडे जाताना ११.२ किमी तर नाशिक फाट्याकडून येतानाचे अंतर ८.८ किमी असणार आहे.

वाकडेवाडीतून केवळ काही पीएमपीच्या मोजक्याच मार्गाच्या बस धावतात. त्यामुळे पुणे शहरात विविध ठिकाणांहून ये-जा करणाऱ्यां प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यांना रिक्षाचाच आधार घ्यावा लागणार आहे किंवा पायपीट करत शिवाजीनगर गाठावे लागणार आहे. दरम्यान याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पीएमपी अधिकाऱ्यांनीही बसस्थानक स्थलांतर होत असल्याने वाकडेवाडी येथून बस वाढविण्याबाबत नियोजन केले जाईल असे सांगितले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *