Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकची पाणीकपात ‘अटळ’

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महापौर रंजना भानसी यांनी दोन वेळ पाणीपुरवठा होत असलेल्या भागात एकवेळ पाणीपुरवठा होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, त्याआधी अहवाल सादर करण्याचे महापौर भानसी यांनी सांगितले होते. हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून पाऊस पडला नाही तर पाणीकपातीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे धरणक्षेत्रात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे धरणातील आटलेला जलसाठा आणि लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

गंगापूर, मुकणे धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केली होती.  त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसे संकेत आधीच दिले होते.

दरम्यान, महासभेत हा विषय गाजलाही होता. शहरातील काही भागात दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जातो. त्या भागात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला असून यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!