Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धनच्या चाहत्यांनी नाशिकसह हरसूलमध्ये केला जल्लोष

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचा कुस्तीगीर हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ ने विजय मिळवत हा किताब आपल्या नावे करत इतिहास रचला.

हर्षवर्धनचा विजय होताच नाशिकसह त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच भगूर येथील बलकवडे अकादमीत संपूर्ण सामना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

हरसूलमध्येही जल्लोष करण्यात आला, अनेकांनी रस्त्त्यावर ढोल ताशांच्या गजरात हर्षवर्धनच्या कामगिरीचा जल्लोष करण्यात आला. हर्षवर्धननेही विजयी होताच खिलाडीवृत्तीचं दर्शन घडवत उपविजेत्या शेळकेला खांद्यावर घेऊन त्याचं अभिनंदन केल्याने नाशिककरांमध्ये हर्षवर्धनविषयीचा लौकीक अधिकच वाढलेला दिसून आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!