Type to search

Breaking News Featured नाशिक

मॉलमध्ये उडी मारणार्‍या युवकाचा मृत्यू; मनोरूग्ण असल्यानेच कृत्य, सुसायईड नोटचाही तपास

Share

नाशिक । प्रतिनिधी

सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी (ता.५) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावरून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या ३८ वर्षीय युवकाचा उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान तो मनोरूग्ण असल्यानेच त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समारे येत आहे. त्याच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्या असून त्या अनुषगांने पोलीस तपास करत आहेत.

स्वप्निल सतिश मगरे (२५, रा. सुदत्त अपार्टमेंट, पाटीलनगर, नवीन नाशिक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. स्वप्निल मगरे यांनी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सिटी सेंटर मॉलमधील तिसर्‍या मजल्यावरून उडी घेतली होती. या घटनेमध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. सिटी सेंटर मॉलचे कर्मचारी संतोष निकम यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र उपचारा दरम्यान रात्री उशिरा स्वप्निल मगरे यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी गंगापूर पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बैसाणे हे करीत आहेत.

दरम्यान, स्वप्निल मगरे याने आत्महत्त्येसाठी उडी घेतली की अपघात याबाबत चर्चा सुरू होती. परंतु त्याच्या वडिलांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल हा वैद्यकीय पदवी मिळवून देखील गेली चार-पाच वर्षापासून काही कामधंदा करत नव्हता. त्याचे स्वतःशीच विचारचक्र सुरु असून तसेच बडबड सुरू असे. यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे तपासी अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच त्याच्या खिशात 3 चिठ्ठ्या सापडल्या असून त्यामध्ये आपल्या वडिल तसेच भावाला कोणीतरी त्रास देत आहे. अशा आशयाचे लिखाण केल्याचे आढळले आहे. तसेच दुसर्‍या चिठ्ठंयांमध्ये काही डॉक्टरांची नावे आहेत. या चिठ्ठ्यांच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!