Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी – मुख्यमंत्री

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शरद पवार यांच्या पक्षात ज्यांना भाजपने प्रवेश दिला नाही तेच आता शिल्लक राहिले आहेत. त्यांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाव, आधे उधर जाव बाकी पवार साहेब जेलरसारखे एकटेच राज्यात फिरत आहेत. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नाशिकमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गंगाघाटावर आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीलाच कॉंग्रेस व राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांचे पक्षप्रवेशासाठी फोन येत होते मात्र, त्यांना प्रवेश दिला नाही. तेव्हढेच आता दोन्ही पक्षात शिल्लक राहिले आहेत असे सांगितले. विरोधी पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, यामध्ये एकही आश्वासन दखलपात्र दिसत नाही. यावरून विरोधी पक्षांनी पराभव आधीच मान्य केलेला दिसून येत आहे.  पुढचे पंधरा-वीस वर्षे आपण सत्तेत येणार नाही असा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध करत सपशेल हार मानली आहे.

गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने पायाभूत सुविधावर भर देत अनेक विकासकामे केली, सगळ काही पाच वर्षांत पूर्ण होणे शक्य नाही अजून अनेक कामे अपूर्ण आहेत. तीही लवकरच मार्गी लागतील.

Posted by दैनिक देशदूत on Thursday, 17 October 2019

आम्ही सर्व क्षेत्रात विकासकामे केले. महाराष्ट्रात परिवर्तनाचे काम आपण केले.  मराठा, धनगर, लिंगायत सह सर्वच समाजासाठी सरकारने काम केले आहे. गाव असो कि शहर सर्वच क्षेत्रात आपल्या सरकरने कामे केली.

राज्यात ३० हजार किमी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते झाले. २० हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग झाली. १० हजार किमीचे राज्य महामार्गांचे काम सुरु आहे. मुंबई-नागपूर समृद्धी हायवे नाशिकमधून जातो. या महामार्गामुळे नाशिक-मुंबई अंतर अवघ्या सव्वा तासांवर येणार आहे. यामुळे दळणवळण सुविधा सुलभ होऊन विकास वाढीस लागणार आहे. नाशिकमध्ये ड्रायपोर्ट, निर्यातक्षम मालास प्राधान्य देऊन याठिकाणी नाशिक शेतमालाचे मोठे कोठार तयार करण्याचा मानस फडणवीस यांनी व्यक्त केला.

केंद्राने नाशिकसाठी फूडपार्क मंजूर केले आहे. फूड इंडस्ट्रीसाठी स्वस्त वीज मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. डिफेन्स इनोव्हेशन इंडस्ट्री उभारणार आहोत. ही गुंतवणूक नाशकात आल्यानंतर रोजगार उभा राहणार आहे. आयटी इंडस्ट्री नाशिकला येईल. नाशिक स्टार्टअप कॅपिटल होऊ शकते. यातून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.

शहराचे चित्र बदलायचे आहेत, स्मार्टसिटीमुले नाशिकमध्ये १५२० कोटींची कामे सुरु आहेत. हायब्रीड मेट्रोचे प्रेझेन्टेशन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनादेखील भुरळ घातली असून वाराणसीत हायब्रीड मेट्रोचे सर्व्हेक्षण झाले आहे.  नाशिक महापालिकेने ग्रीन बसेस घेतला पाहिजे, आधुनिक दळणवळण सोय करून देणार आहोत. शासकीय मेडिकल कॉलेज नाशिकमध्ये वर्षभरात मार्गी लागणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.


…म्हणून सानप यांचे तिकीट कापले

भ्रष्टाचारामुळेच बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापले. वेळप्रसंगी निर्णय घ्यावे लागतात. सानप यांच्यासोबत वीस वर्षे मी काम केले,पण जनादेश ओळखून निर्णय घ्यावे लागतात म्हणून नवा पहिलवान मैदानात उतरवला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!