Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : भाऊबीजेसाठी निघालेल्या भावाचा अपघाती मृत्यू; सोनज येथील घटना

Share

चाळीसगाव । प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळी प्र.दे. ते आडगाव दरम्यान स्विफ्टच्या धडकेत दुचाकीस्वार चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोनज (टाकळी, ता.मालेगाव) येथील मनोज शेवाळे (वय 35) हे उंबरखेड येथील बहिणेकडे भाऊबिजेसाठी येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. भाऊ ओवाळणीसाठी घरी येण्यापूर्वीच त्याच्या मृत्यूची बातमी समजल्याने बहिणीने एकच हंबरडा फोडला. ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली.

सोनज (टाकळी, ता.मालेगाव) येथील मनोज शेवाळे हे दुपारी 12 वाजेच्या दरम्यान तालुक्यातील उंबरखेड येथे राहणार्‍या बहिणीकडे भाऊबिजेच्या सणासाठी येण्यासाठी निघाले होते.

दुपारी 3 वाजेच्या दरम्यान रस्त्यात टाकळी प्र.दे. ते आडगावच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला स्विफ्टने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाऊबिजेच्या सणासाठी ओवळणीसाठी घरी येणार्‍या भावाची वाट पाहत असलेल्या बहिणीला त्याच्या मृत्यूची बातमी कळताच तिने एकच हबरडा फोडला.

घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव येथील शासकिय रुग्णालयात पाठवला.  याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!