Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : आधी सीसीटीव्ही फोडले नंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम तोडून १३ लाख लुटले

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या जेलरोड परिसरातील शिवाजीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून तब्बल 13 लाख रुपये लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आज सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्‍वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पोलीस निरीक्षक सुधीर डुंबरे, उपनगर पोलीस, तसेच शहरातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

भरवस्तीत एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडुन चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. जेव्हा ही चोरी झाली त्यावेळी इथे कुठलाही सुरक्षारक्षक कर्मचारी नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

याच परिसरात रेल्वे टेशन असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम चा काही भाग कापून 13 लाखावर डल्ला मारला ही सर्व चोरी करत असताना चोरट्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळणे अवघड झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!