Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निफाड : नियंत्रण सुटल्याने ट्रक १०० फुट खाली कोसळला; सिंगापूर पुलानजीक घडली घटना

Share

निफाड | प्रतिनिधी

निफाड -नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर नाशिककडून नांदगावकडे जाणारा खताचा ट्रक अपघातग्रस्त झाला. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर निफाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी की, युरिया खताने भरलेला ट्रक क्रमांक एमएच१५, एजी ७८०२   निफाडमार्गे नांदगावकडे निघाला होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथील कादवा नदीवरील सिंगापूर पुलानजीक असलेल्या पूलावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकवरील नियंत्रण सुटले.

या घटनेत ट्रक दोन्ही पुलाच्या मध्ये 100 फूट खाली नदीकाठावर कोसळला. ट्रक चालक दशरथ उत्तम सांगळे (वय 27 रा. वेहळगाव. ता.नांदगाव.जि नाशिक.) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेत निफाड येथील प्रवाशी सुका जनार्दन गवळी, उत्तम पंडित माळी, ताराबाई उत्तम माळी, उगाव रोड बेगरवस्ती निफाड. हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर निफाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या पुलावर तीन महिन्यांत दुसरी अपघाताची घटना घडली आहे. पहिल्या घटनेतही चालकाचा मृत्यू झाला होता.  या घटनेचा अधिक तपास निफाड पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलिस हवालदार पठाडे, माळी करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!