Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे तीन लाखांची लाच स्वीकारताना अटकेत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.  नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी ही माहिती दिली आहे. आज दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात कारवाई करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना तांत्रिक कारणामुळे कमी करण्यात आले. दरम्यान, त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून दहा लाखांची लाच चुंभळे यांनी मागितली होती. तडजोड करून लाचेची रक्कम प्रथम सहा व नंतर तीन लाखांवर आणण्यात आली.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क साधून तक्रार दाखल केली. दरम्यान, आज रक्कम देण्याचे ठरले होते त्यानुसार सापळा रचून चुंभळे यांना ताब्यात घेण्यात आले.  ही कारवाई अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, माजी खासदार आणि नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यावरही दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन, दिवाळी बोनस, भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याच्या आरोपाखाली एसीबीकडे चौकशी सुरु आहे. याच काळात जवळपास ५७ लाख रुपये बेहिशोबी रोकड एका वाहनात कर्मचाऱ्याकडे आढळून आल्याचीही घटना घडली होती. या सर्वच प्रकारामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती लाचखोरीच्या कचाट्यात अडकली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!