Type to search

२० देशातून परतलेले १०२ नागरीक नाशकात; विलगीकरण करुन होणार तपासणी

Share

नाशिक । प्रतिनिधी

करोना व्हायरस संसर्गाचा धोका लक्षात घेता परदेशातून शहरात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनूसार सद्यस्थितीत 20 देशातून परतलेले 102 नागरिक नाशिकमध्ये आहे. त्याची माहिती घेण्याचे काम सुरु असून काही जणांची विलगीकरण करुन चाचणी करण्यात आली आहे.

परदेशातून येणार्‍या नागरिकांमुळे भारतात करोनाचा फैलाव झाला आहे. ते बघता केंद्र शासनाने करोना संसर्ग बाधित सात देशातील नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे. परदेशातून परतणार्‍या भारतीयांची विमानतळावर मेडीकल तपासणी केली जात आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काम धंद्यानिमित्त परदेशात गेलेले नाशिककरही परतत आहे.

20 देशातील 102 नागरिक परदेशातून मुबंईमार्गे नाशिकमध्ये परतले आहेत. त्यामध्ये दुबंईमधून 42, इटली 12, चीन 3, सौदी अरेबिया 6, जर्मनी 4, युके 5 व इतर देशातील प्रत्येकी एक नागरिक नाशिकमध्ये परतले आहेत. करोनाग्रस्त देशातून हे नागरिक परतले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.

करोगाग्रस्त देशातून हे नागरिक आले असल्याने त्यांच्या संर्पकात इतर लोक आल्यास करोनाचा संसर्ग फैलण्याची भीती आहे. त्यामुळे या लोकांचे विलगीकरण करुन मेडीकल तपासणी केली जाणार आहे.

त्यासाठी जिल्हा रुग्णालय, डॉ.जाकीर हुसैन, डॉ.वसंतराव पवार मेडीकल कॉलेज, अपोलो हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

या नागरिकांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या हातावर विशिष्ट शिक्का मारला जाईल. जेणेकरुन त्यांची ओळख पटवणे सापे होईल व इतर नागरिकांना देखील लक्षात येईल. जिल्हा प्रशासनाने टूर कंपन्यांकडून नाशिकमधील किती नागरिक परदेशात आहे, याची माहिती मागवली आहे. तसेच, माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!