जुळ्या बहिणींना दहावीत मार्कही पडले सारखेच

0

बोलठाण, (वार्ताहर) ता. १७ : अनेकदा जुळ्या मुलांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य असते. इतकेच नव्हे, तर एकाला जी वस्तू हवी असेल, तर दुसऱ्याला तिच हवी असते. अनेकदा जुळी भावंडे वेशभूषाही सारख्याच करतात.

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जुळ्या बहिणींबाबत असाच आश्चर्यकारक प्रकार घडला आहे.

नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत दोघींच्याही मार्कांची टक्केवारी सारखीच आहे.

निशा जाधव आणि ईशा जाधव असे या जुळ्या बहिणींची नावे आहेत. दोघींनाही एसएससीत प्रत्येकी ८०. २० टक्के गुण मिळाल्याने गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निशा जाधव हिला मराठी 59, हिंदी 68, इंग्लिश 71, गणित 85, सोशल सायन्स 91, तर सायन्स व टेक्नोलॉजी 86  असे मार्क मिळाले आहेत. तर तिच्या जुळ्या बहिणीला ईशा जाधव हिला मराठीत 58, हिंदी 77, इंग्लिश 66, गणित 88, सोशलसायन्स 87,तर सायन्स व टेक्नोलॉजी 87 असे गुण मिळाले आहेत.

प्रत्येक विषयात दोघींनाही निरनिराळे गुण असले, तरी  गुणांची सरासरी टक्केवारी मात्र एकच भरली आहे. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी आनंद व्यक्त केला.

या जुळ्या बहिणींचे वडिल विजय जाधव हे शेती पंप दुरूस्ती करून उदरनिर्वाह करतात. ते म्हणाले की लहानपणापासून त्यांच्याबाबतीत असे अनेक योगायोग घडत आले आहेत. दहावीतील टक्केवारी हा त्यापैकीच एक आहे.

या कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बिकट असूनही मुलींनी मात्र आहे त्या स्थितीत अभ्यास करून घवघवीत यश संपादन केले.

या जुळ्या बहिणी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थीनी आहेत.

LEAVE A REPLY

*