Type to search

नांदगाव : पावसामुळे कांदा शेड तुटून दोन गायीचा मृत्यू; घराचे नुकसान

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : पावसामुळे कांदा शेड तुटून दोन गायीचा मृत्यू; घराचे नुकसान

Share

बोलठाण । प्रतिनिधी : नांदगाव तालुक्यतील जातेगाव व वसंतनगर येथे वादळी वाऱ्या सह पावसाने हजेरी लावली. यावेळी जातेगाव येथील कांदा व्यापारी असलेल्या शेतकऱ्याच्या मातोश्री ट्रेडिंग कंपनी चे कांदा शेड उडून गेले. यामध्ये दोन गाईचा मृत्यू झाला तर वसंतनगर तांडा येथील घरावरील पत्रे उडाले.

याबाबत सविस्तर असे की जातेगाव येथे सांयकाळी साडे पाच ते सहा वाजता जोरदार वाऱ्या बरोबर पावसाने आगमन केले. यावेळी कांदा व्यापारी कल्पना संतोष गायकवाड यांच्या मातोश्री ट्रेडिंग कंपनीचे कांदा शेड या पावसात जमीनदोस्त झाले.

या शेडमध्ये असलेल्या दोन गीर जातीच्या गाई जागीच मरण पावल्या. कांदा शेड मध्ये जवळपास ११०० क्विंटल (अंदाजे) कांदा असल्याचे समजते. तसेच जातेगाव पासून जवळ असलेल्या वसंतनगर येथे ही चार राहत्या घराचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी जनावरांचा चाऱ्याचे नुकसान झाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!